मुलीचं लग्न हा प्रत्येक आई-वडिलांचा आणि कुटुंबातील सर्वांचा मोठा भावनिक प्रश्न असतो. प्रत्येक आई-बाप त्यांच्या मुलीचं लग्न जास्तीत जास्त चांगलं कसं होईल यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी वर्षानुवर्ष बचत करतात. प्रसंगी कर्ज काढूनही मुलीचं लग्नात तिची सर्व हौस पूर्ण केली जाते. पण, कर्नाटकात सध्या एक जाहिरात चर्चेचा विषय बनलीय. कारण आई-वडिलांना त्यांच्या मृत्यू पावलेल्या मुलीचं लग्न लावायचं आहे. त्यासाठी त्यांनी ही जाहिरात दिलीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
30 वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या मुलीसाठी नवरा हवाय ही वृत्तपत्रात दिलेली जाहिरात सध्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय. दक्षिण कन्नडमधल्या पुत्तूरमधील एका कुटुंबानं ही जाहिरात दिलीय. मुलीचा अविवाहित असताना झालेला मृत्यू ही कुटुंबाच्या दुरावस्थेचं कारण आहे, अशी त्यांची समजूत आहे.
या कुटुंबातील नवजात मुलीचा 30 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर या कुटुंबाला सतत अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागतोय. या संकटांचं कारण असू शकतं, असं त्यांना काही ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितलं, त्यानंतर त्यांनी मृत व्यक्तीचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला.
( नक्की वाचा : वडिलांच्या मृत्यूनंतर लहान वयात कुटुंबाची जबाबदारी, Viral Video पाहून आनंद महिंद्रा यांची मोठी घोषणा )
मुलीच्या आत्म्याला शांती देण्यासाठी त्यांच्या कुटुंबानं तिचं लग्न लावून देण्याचा निर्णय दिलाय. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील एका मोठ्या वृत्तपत्रात जाहिरात दिलीय. '30 वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या मुलीच्या लग्नासाठी 30 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलाचा शोध सुरु आहे. प्रेथा मडुवे ( आत्मांचं लग्न) व्यवस्था करण्यासाठी कृपया या नंबरवर फोन करा' असं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलंय. नातेवाईक आणि मित्र परिवारानं बरेच प्रयत्न केल्यानंतरही वय आणि जातीच्या अटीमध्ये बसणारा मृत मुलगा शोधणे शक्य झालं नाही, अशी माहिती मृत मुलीच्या आई-वडिलांनी दिली.
( नक्की वाचा : हत्येपूर्वी डॉक्टरांना केलं टॉर्चर, पाळीव कुत्रा घेणार मारेकऱ्यांचा शोध? )
काय आहे परंपरा?
मृत मुलीचं लग्न लावणे ही तुलूनाडू भागातील एक परंपरा आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीवरील तीन जिल्हे आणि केरळमधील कासरगोड जिल्ह्यात हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. तुळू ही त्यांची बोलीभाषा आहे. या परिसरात मृत व्यक्तींच लग्न लावण्याची एक प्रथा असून तिचं मोठं भावनिक महत्त्व आहे.
तुलुवा लोककथानुसार मृत व्यक्ती देखील कुटुंबाचा आणि कुटुंबातील सुख-दु:खाचे भागीदार असतात. त्यामुळे 'वैकुंठ समारधने' आणि 'पिंड प्रदान सारख्या विधीमधील त्यांना भोजन तसंच दिवगंत आत्म्यांची लग्नाची प्रथा या संस्कृतीमध्ये आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world