Emotional Post 'कॅन्सरने जिंकले, मित्रांनो', 21 वर्षांच्या तरुणाची 'शेवटची' दिवाळी पोस्ट, सर्वांचे डोळे पाणवले

Emotional Post: एका 21 वर्षांच्या तरुणाची हृदयद्रावक कहाणी वाचून सध्या संपूर्ण सोशल मीडियावर (Social Media) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Emotional Post: 'कॅन्सरने जिंकले, मित्रांनो' या त्याच्या शब्दांनी लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
मुंबई:

Emotional Post: आयुष्यात मोठी स्वप्ने पाहिली होती, पण ती पूर्ण होण्यापूर्वीच नियतीने घात केला... कर्करोगाने (Cancer) आयुष्य वेगाने हिरावून घेतलेल्या एका 21 वर्षांच्या तरुणाची हृदयद्रावक कहाणी वाचून सध्या संपूर्ण सोशल मीडियावर (Social Media) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तरुणपणीच कॅन्सरशी सुरु असलेली लढाई थांबवण्याची वेळ आली आहे, याची जाणीव झाल्यावर त्याने 'रेडिट' (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक भावनिक पोस्ट (Emotional Post) लिहिली. यात त्याने आगामी दिवाळीचा सण (Diwali Festival) 'शेवटच्या' वेळी पाहावा लागणार असल्याची खंत व्यक्त केली. 'Cancer Won, Guys' (कॅन्सरने जिंकले, मित्रांनो) या त्याच्या शब्दांनी लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. हजारो जणांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली असून अनेकांनी त्यांना भावनिक संदेश पाठवला आहे. 

उपचाराचे सर्व पर्याय संपले

'r/TwentiesIndia' या 'रेडिट' सबरेडिटवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये, या तरुणाने 2023 मध्ये निदान झालेल्या चौथ्या टप्प्यातील (Stage 4) कर्करोगाशी सुरू असलेल्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे.

अनेक महिने केमोथेरपी (Chemotherapy) आणि रुग्णालयातील (Hospital) उपचारांनंतर डॉक्टरांनी आता सर्व उपचार पर्याय संपल्याचे सांगितले आहे. यामुळे तो बहुधा हे वर्ष पूर्ण करू शकणार नाही, असा निराशाजनक अंदाज डॉक्टरांनी दिला आहे.

( नक्की वाचा : Breast Cancer: पुरुषांनो, गाफील राहू नका! तुम्हालाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर; ही आहेत गंभीर लक्षणे )
 

'पुढच्या वर्षी माझ्या जागी दुसरे कुणीतरी पणती लावेल'

दिवाळी जवळ येत असताना, हा तरुण आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो, "दिवाळी लवकरच येत आहे आणि रस्त्यांवर दिव्यांची रोषणाई (Lights) दिसू लागली आहे. हे जाणून घेणे खूप कठीण आहे की, मी ही रोषणाई शेवटच्या वेळी (Last Time) पाहत आहे. मला हे दिवे, हे हसण्याचे क्षण आणि हा उत्साह खूप आठवेल. माझे आयुष्य शांतपणे संपुष्टात येत असताना जग नेहमीप्रमाणे पुढे सरकताना पाहणे खूप विचित्र वाटते आहे. मला माहीत आहे की, पुढच्या वर्षी माझ्या जागी दुसरे कोणीतरी पणती लावेल, आणि मी फक्त एका आठवणीत जिवंत राहीन."

अनेक स्वप्न अपूर्ण 

त्याने आपल्या अनेक अपूर्ण स्वप्नांची (Unfulfilled Dreams) व्यथाही मांडली आहे. प्रवास करणे, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे आणि कुत्रा दत्तक (Adopt a Dog) घेणे अशी त्याची स्वप्ने होती. मात्र, आता हा मर्यादित वेळ त्याला आठवण करून देत आहे की, या सर्व महत्त्वाकांक्षा आता निसटून जात आहेत.

Advertisement

पोस्टच्या शेवटी त्याने आपले मन मोकळे केले आहे: "मी माझ्या आई-वडिलांच्या (Parents) चेहऱ्यावरची खिन्नता पाहू शकतो. मला माहीत नाही की, मी ही पोस्ट का करत आहे. कदाचित, शांतपणे पुढच्या प्रवासाला निघून जाण्यापूर्वी एक छोटीशी खूण (Small Trace) सोडावी, म्हणून मी हे सर्व बोलून दाखवत आहे."

इथे वाचा पोस्ट

Cancer won guys , see ya !!!
byu/Erectile7dysfunction inTwentiesIndia

सोशल मीडियावर 'चमत्कारा'साठी प्रार्थना

या तरुणाच्या पोस्टने रेडिटवरील हजारो लोकांचे हृदय जिंकले आहे. अनेक युजर्सनी दुःख व्यक्त केले असून, त्याच्यासाठी चमत्कार (Miracle) होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सहानुभूती, आशा आणि जीवनातील साध्या आनंदाचे मोल जाणून घेण्याचे प्रोत्साहन देणाऱ्या संदेशांचा (Messages) अक्षरशः पूर आला आहे.

Advertisement

एका युजरने लिहिले आहे की, "मला आशा आहे की, चमत्कार घडेल, तुमच्या कर्करोगामध्ये काहीतरी 'बिघाड' होईल आणि सर्वकाही ठीक होईल! धीर धरा, मित्रा. आणि त्याच वेळी, तुमच्याकडे जे काही आहे, त्याचा पुरेपूर आनंद घ्या. संध्याकाळी छान फिरायला जा. सकाळी गाणाऱ्या पक्षांचा आनंद घ्या. चांगला नाश्ता करा. कुटुंब आणि मित्रांसोबतच्या (Family and Friends) सहवासाचा आनंद घ्या."

दुसऱ्या युजरने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे, " 'माझीही स्वप्नं होती, माहीत आहे का?'... हा भाग वाचून मी पुरता तुटलो. तुम्हाला खूप प्रेम आणि शक्ती. 'F1 2007' मध्ये 'फेरारी गाई' चॅम्पियनशिप जिंकला होता, पण सीझन पाहता कोणालाही वाटले नव्हते की, हे शक्य होईल. त्यामुळे 'जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते संपलेले नसते' (it's not over, until it's over)."

Advertisement

या पोस्टवरच्या हजारो प्रतिक्रिया वाचून, या तरुणाने दाखवलेल्या धैर्याला आणि जगण्याची इच्छाशक्तीला (Willpower) नेटीझन्सनं सलाम केला आहे.
 

Topics mentioned in this article