CCTV Video : सीसीटीव्ही पोलिसांसाठी मोठं वरदान ठरलं आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांना अनेक केसेस सोडवणं शक्य होतं. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या घरात, इमारतीच्या गेटजवळ सीसीटीव्ही लावले जातात. कोणत्याही गुन्ह्यात आरोपी सापडला जावा यासाठी सीसीटीव्ही महत्त्वाचा ठरतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घरातही सीसीटीव्हीमुळे अनेक फायदे होत असतात असं दिसतंय. सध्या सोशल मीडियावर सीसीटीव्हीचा एक ट्रेंड प्रसिद्ध होत आहे. या ट्रेंडमध्ये घरात सीसीटीव्ही लावले असतील तर अधिक सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कारण तुम्ही सावधान राहिला नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते आणि याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.
पत्नी घरात असते तेव्हा पती आनंदात असतो. सर्व जबाबदारी ती घेते. मात्र पत्नी जेव्हा सुट्टीसाठी काही दिवस घराबाहेर पडते तेव्हा अधिक आनंद होतो, असं अनेक नवरोबांचा अनुभव असतो. मात्र या अतिआनंदाबाबत बायकोला जराशीही चुणूक लागली तरी तुमच्या आयुष्यावर मोठा 'आघात' होऊ शकतो. असंच काहीसं या व्हिडिओमधील नवरोबासोबत घडलं आहे.
या पठ्ठ्याची बायको काही कारणास्तव घर सोडून निघून जाते. तेव्हा नवरा तिला थांबवण्याचा बराच प्रयत्न करतो. अगदी दारापर्यंत तिला अडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र बायको त्याचं ऐकत नाही आणि निघून जाते. बायको घरात असेपर्यंत नवरा दु:खी असतो. मात्र बायको घराबाहेर पडताच त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही. तो चक्क नाचायला लागतो. मात्र कालांतराने सीसीटीव्हीमुळे नवरोबाचा खरा चेहरा बायकोसमोर येतो, तेव्हा मात्र तिच्या अंगात कालीमाताच शिरते आणि नवऱ्याची चांगलीच धुलाई होते. त्यामुळे सुरक्षेसाठी घरात सीसीटीव्ही लावणं चांगलं, मात्र यातून तुमची सुरक्षा धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.