Essay On Mela In Hindi: हिंदी भाषेमध्ये निबंध-शायरी लिहिण्याचा अनेकांना छंद असतो, तर काहीजण अशा प्रकारचे प्रयोग करणे टाळतात. दुसरीकडे काहीजण लिखाणामध्ये इतकी क्रीएटिव्हिटी दाखवतात की शिक्षकही थक्क होतात. एका इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याने हिंदी भाषेमध्ये लिहिलेला असाच एक निबंध सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या लिखाणातील क्रीएटिव्हिटी पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. मुलाने उत्तरपत्रिकेमध्ये जत्रेबाबत दिलेले ज्ञान पाहून युजर्संना त्याच्यामध्ये भावी यू-ट्युबर दिसत आहे.
यू-ट्युबरच्या शैलीमध्ये लिहिला निबंध
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वरील युजर भूमिका राजपूतने आपल्या अकाउंटवर या मुलाच्या उत्तरपत्रिकचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या विद्यार्थ्याची शिक्षिका असल्याचेही तिने म्हटले आहे. विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेचे फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, 'इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांची हिंदी भन्नाट असते. 'जत्रा विषयावरील निबंध लिहिणारा इयत्ता आठवीतील हा मुलगा माझा विद्यार्थी आहे. शेअर केलेल्या स्क्रीनशॉटद्वारे मुलाने जत्रा विषयावर लिहिलेला निबंध आपण वाचू शकता, ज्यामध्ये त्याने लिहिलंय की, ‘मेला दिनों का आता है, एक बार आकर चला जाता है. मेले में बहुत सी दुकानें आती हैं, चाट, फुलकी, समोसा.. आप भी कभी मेले में गईं कमेंट करते बताएं...'