जाहिरात

100 रुपयांत विकले जातात कपलचे प्रायव्हेट व्हिडीओ, दलालांचा अवैध धंदा, Telegram वर व्हिडीओ लीक

टेलिग्रामवर कपलच्या प्रायव्हेट व्हिडीओ विक्रीचा अवैध धंदा उघडकीस आला आहे.कमी पैशांमध्ये कपल्सचे प्रायव्हेट व्हिडीओ लिंक पुरवले जात आहेत.

100 रुपयांत विकले जातात कपलचे प्रायव्हेट व्हिडीओ, दलालांचा अवैध धंदा, Telegram वर व्हिडीओ लीक
Couple Private Video Leak On Telegram

Couple Private Video Viral News : टेलिग्रामवर कपलच्या प्रायव्हेट व्हिडीओ विक्रीचा अवैध धंदा उघडकीस आला आहे.कमी पैशांमध्ये कपल्सचे प्रायव्हेट व्हिडीओ लिंक पुरवले जात आहेत. हे प्रकरण लोकांच्या गोपनीयतेसाठी धक्कादायक बाब बनली आहे. सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्सचा वाढता वापर पाहता अशाप्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं समोर येत आहेत. आता टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर लोकांच्या गोपनीयतेशी खेळ करून उघडपणे खासगी व्हिडिओ विकले जात आहेत. हा प्रकार फक्त एका राज्यापुरता मर्यादित नाही, तर अनेक राज्यांमध्ये याचं नेटवर्क पसरलेलं आहे. याबाबत नवभारत टाईम्सने वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नुकताच एका कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जेव्हा या व्हिडीओची चौकशी करण्यात आली, तेव्हा खळबळजनक माहिती समोर आली. हा व्हिडीओ फक्त एक उदाहरण आहे, अशी माहिती समोर आली. टेलिग्रामवर शेकडो ग्रुप सक्रिय आहेत,जिथे पैसे घेऊन खासगी व्हिडिओंचे लिंक शेअर केले जातात. हा बेकायदेशीर व्यवसाय अवैधरित्या लीक झालेल्या मोबाईल व्हिडिओंवर आधारित आहे.

नक्की वाचा >> WhatsApp उघडण्याआधी 'हे' आताच वाचा, GhostPairing मुळे तुमचं अकाऊंट होणार हॅक, 'या' सेटिंग्ज बदला

दलाल चालवतात बेकायदेशीर ग्रुप्स

तपासात उघडकीस आलं की, काही दलाल अशाप्रकारचे ग्रुप चालवत आहेत. पेमेंट झाल्यावर ग्राहकाच्या मागणीनुसार लिंक पाठवली जाते.हे व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांतील कपल्सचे असल्याचा दावा केला जात आहे. पेमेंटसाठी QR कोड पाठवले जातात आणि रक्कम मिळताच व्हिडिओची लिंक दिली जाते. तो व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवलेला असला, तरीही अशा लिंक्स सेंड केल्या जातात. 

प्रत्येक व्हिडिओची वेगळी किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओची किंमत वय आणि लोकेशननुसार ठरते.काही व्हिडिओ 100 रुपयांत विकले जातात. तर  खास राज्यांच्या व्हिडिओंसाठी 200 ते 400 रुपये घेतले जातात. छत्तीसगढी कपल्सच्या व्हिडिओंना जास्त मागणी असल्याचं समजते. जे एक चिंतेचा बिषय बनला आहे. 

नक्की वाचा >> Viral Video: "आता तू बघच..", रात्रीच्या प्रवासादरम्यान Rapido ड्रायव्हरने महिलेसोबत केलं घाणेरडं कृत्य

छोटी चूक, मोठी शिक्षा

सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोबाईलमध्ये असलेल्या खासगी डेटाच्या सुरक्षेबाबत लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. एका छोट्या चुकीमुळे खासगी फोटो किंवा व्हिडिओ लीक होऊ शकतात. ज्यांचा वापर ब्लॅकमेलिंग आणि अवैध विक्रीसाठी केला जातो. तज्ज्ञांनी लोकांना सतर्क राहण्याचे, खासगी कंटेंट शेअर न करण्याचे आणि संशयास्पद अॅप्स व लिंकपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com