Viral Video : पेट्रोल पंपावर तुमचीही फसवणूक होतेय? काय आहे '0' नंबर मीटर स्कॅम? ग्राहकाने केला पर्दाफाश

पेट्रोल पंपावर गेल्यावर गाडीत इंधन भरताना नेहमी सतर्क राहायला हवे. कारण अनेक प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये एखादा असा कामगार असतो, जो अतिरिक्त कमाईसाठी ग्राहकाला फसवण्याच्या तयारीत असतो. व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच.

जाहिरात
Read Time: 3 mins
Petrol Pump Scam Viral Video
मुंबई:

Petrol Pump Scam Video Viral : पेट्रोल पंपावर गेल्यावर गाडीत इंधन भरताना नेहमी सतर्क राहायला हवे. कारण अनेक प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये एखादा असा कामगार असतो, जो अतिरिक्त कमाईसाठी ग्राहकाला फसवण्याच्या तयारीत असतो. एक स्कॅमर पेट्रोल पंपावरील व्यक्तीसोबत फसवणुकीचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण ग्राहक सावध असल्याने त्या व्यक्तीने स्कॅम हाणून पाडतो आणि या प्रकाराचा पर्दाफाश करतो. त्यानंतर तो रडायला लागतो. मात्र ग्राहक त्याला कार्ड पेमेंट मशीनमध्ये टाकलेली रक्कम देण्यास नकार देतो. कारण कार्ड मशीनमध्ये टाकलेली रक्कम आणि पंपाच्या मशीनवर दाखवलेली रक्कम दोन्ही वेगवेगळ्या असतात.

व्हिडीओच्या सुरुवातीला पाहू शकता, जेव्हा ग्राहक त्याच्या गाडीची टाकी फुल करतो, तेव्हा ऑइल डिस्पेन्सिंग मशीनच्या मीटरवर 3526 रुपये 63 पैशांचे बिल दिसते. इतक्या पैशांत गाडीत सुमारे 37.21 लिटर पेट्रोल भरलेले असते. पण जेव्हा पेट्रोल भरणारा कर्मचारी ग्राहकाला बिल पाठवतो, तेव्हा ते 3745 रुपये 60 पैसे' इतकं असतं. हे पाहून ग्राहक त्या कर्मचाऱ्यावर संतापतो.

नक्की वाचा >> लेक रात्री 2 वाजता ढसाढसा रडत होती, बापाने केलं असं काही..व्हिडीओ पाहून सर्वच आई-वडिलांचे डोळे पाणावतील!

ग्राहकाने 100 नंबरवर तक्रार करण्यास सांगितलं आणि..

ग्राहक त्याला म्हणतो, “न पाहता पेमेंट घेताय, आम्हीही शिकलेले आहोत, आमच्या ऑफिसमध्येही मशीन आहेत. यात 3600 रुपये आपोआप कसे आले?” ग्राहकाच्या प्रश्नावर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याजवळ फक्त एवढाच उत्तर असतो की, मशीन मीटरशी जोडलेले आहे आणि हे आपोआप आले आहे. यात त्याची काही चूक नाही. जेव्हा ग्राहक त्याला 100 नंबरवर तक्रार करण्यास सांगतो. तेव्हा तो आपली चूक लपवण्याचा प्रयत्न करतो आणि ग्राहकाला योग्य रक्कम एंटर करून देतो. पुढे पेट्रोल पंपावरील कर्मचारी म्हणतो, “पैसा कोणाच्याही खिशातून गेला, चांगलं थोडंच आहे.” पण ग्राहक त्याच्याकडून पैसे परत मागताना असं म्हणतो की, “मेहनतीचं सगळं चांगलं आहे, पण हरामचा 2 रुपयाही मी सोडत नाही.” 

Advertisement

ओमकार खन्ना (@khannaomkar) यांनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलंय, “जे लोक म्हणत आहेत की अमाउंट ऑटोमॅटिक येते, मी सहमत आहे की ऑटोमॅटिक येते. पण याने CNG वर जाऊन मॅन्युअली अमाउंट टाकली, ज्यात स्वतःच्या मर्जीने अमाउंट ऍड केली गेली. हा फक्त 60 सेकंदांचा क्लिप आहे, पण स्कॅम म्हणजे स्कॅमच असतो.”

नक्की वाचा >> ग्राहकांची मज्जाच मज्जा! आता Maruti Fronx वर मिळणार वर्षभरातील सर्वात मोठं डिस्काऊंट, किंमत वाचून खुश व्हाल

मीटर आणि मशीन तपासूनच पेमेंट करा…

@khannaomkar नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, “हा व्हिडिओ शेअर करण्यामागे फक्त एकच कारण आहे. माझ्यासोबत जो स्कॅम झाला, तो तुमच्यासोबत होऊ नये.” आतापर्यंत या व्हिडिओला सुमारे 35 लाख व्ह्यूज आणि 1 लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर पोस्टवर दोनशेहून अधिक कमेंट्सही आले आहेत. तेल भरताना ‘झिरो' पाहण्यासोबतच पेमेंट करताना एकदा रक्कम नक्की तपासा. विशेषतः जेव्हा तुम्ही कार्ड पेमेंट करत असाल, तेव्हा मीटर आणि कार्ड मशीनवरील रक्कम जुळवूनच पेमेंट करा.

Advertisement