Viral Dmart VIDEO: देशभरात महिलांच्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अगदी सार्वजनिक ठिकाणीही महिलांची छेड काढण्याचे, अश्लील टिप्पणी करण्याचे प्रकार घडतात. सार्वजनिक ठिकाणी महिला- तरुणींना त्रास देणाऱ्या टोळकी सर्रासपणे पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका डीमार्टमधील कर्मचाऱ्याने बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलेला पाहून असं काही कृत्य केलं की सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
इंदूरमधील विजय नगर येथील सी२१ मॉलमध्ये असलेल्या डी मार्टमध्ये एक माणूस आपल्या पत्नीसोबत खरेदीसाठी आला होता. त्यांचे नवजात बाळही त्यांच्यासोबत होते. खरेदीनंतर, जेव्हा तो बिल भरण्यासाठी बिलिंग काउंटरवर पोहोचला, तेव्हा त्याने आपल्या पत्नीला बाजूला जायला सांगितले. त्याचवेळी ती स्त्री नवजात बाळाला दूध पाजायला गेली होती.
यावर बिलिंग काउंटरवरील कर्मचारी बाळाला दूध पाजत असलेल्या त्या स्त्रीवर हसला आणि तिच्याकडे बोट दाखवत इतर कर्मचाऱ्यांना विचारू लागला, "तुम्ही दूध पिणार का?" हे ऐकताच महिलेच्या पतीने त्याला तात्काळ जाब विचारला. त्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, पण तरीही तो निर्लज्ज कर्मचारी हसतच होता आणि आपली चूक मान्य करत नव्हता.
Cab Scam: सावधान! 285 रुपयांच्या राईडचं 6000 रुपये बिल... धक्कादायक कॅब स्कॅम, तुम्हीही व्हा अलर्ट
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलेचा पती रागात कर्मचाऱ्याला त्याच्या कृतीबद्दल जाब विचारत आहे, मात्र तरीही तो मुलगा हसत आहे. त्याला आपल्या या विकृत कृत्याबाबत कोणताही पश्चाताप वाटला नाही. या संपूर्ण प्रकरणावर डीमार्टच्या मॅनेजरनेही कोणतीही ठोस कारवाई केली नाही, याऊलट त्याने हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
"Catcalling at a breastfeeding mother." 🚨
— Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) March 13, 2026
A D-Mart staff passed double-meaning,
sexist and filthy remarks at a woman while she was feeding her baby. Truly disgraceful.
Has this misogynist man forgotten his own mother's milk? How low can someone fall? pic.twitter.com/C6OekSeC4A
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या माणसाने अडवल्यानंतरही तो मुलगा निर्लज्जपणे हसत आहे, याचा नेटकऱ्यांना प्रचंड राग आला. नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना या मुलाची विकृती ठेचली पाहिजे असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने या मुलाला पोलिसांच्या ताब्यात द्या अशी मागणी केली आहे. दरम्यान, काही महिला नेटकऱ्यांनीही या संपूर्ण प्रकरणावरुन राग व्यक्त करताना महिलांना नेहमीच अशा गोष्टींना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे.
Rupali Chakankar: "अहंकार धुळीस मिळेल, Wait and Watch..." रुपाली चाकणकरांना कुणी दिला इशारा?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world