Daughter Demand Sugar Dady Viral Video: 'मला शुगर डॅडीची गरज आहे, तु एखादा श्रीमंत म्हातारा शोध', असं मुलगी आपल्या विधवा आईला बोलली तर? अत्यंत उद्धट, संतापजनक असा संवाद एका मुलीने आपल्या आईसोबत केला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या मुलीच्या वागण्यावर निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका करत आपल्या आई- वडिलांचा कसा सन्मान करायचा हे शिकून घे.. असा सल्ला दिला आहे. नेमकं काय घडलं? वाचा..
मला श्रीमंत बाप पाहिजे..., मुलीचा उद्धटपणा
सोशल मीडियावर सध्या आई आणि मुलीमधील संवादाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगी आपल्या विधवा आईला एखादा श्रीमंत पुरुषाला पकडण्याचा, विधवा असल्याचा फायदा घेण्याचा सल्ला देत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी आईला एक श्रीमंत म्हातारा शोध, मला शुगर डॅडी हवा आहे असं म्हणते. माझ्यासाठी स्वतःचा बळी दे, मला श्रीमंत बाप दे, माझे आयुष्य चांगले करण्यासाठी तु विधवा असल्याचा फायदा घे.. अशी मागणी करते. मुलीचे शब्द ऐकून आई संतापते, तिचा हात झटकते. मात्र मुलगी हसत खिदळत आईला उद्धट सवाल करत आहे.
आई, तुझे केस गळत आहेत, मग या वयात श्रीमंत, टक्कल असलेला माणूस शोधण्यात काय हरकत आहे? मला एक श्रीमंत वडील हवे आहेत." तुझ्या म्हातारपणाचा फायदा घे, एखाद्याला डेट कर, मी तुझी प्रोफाईल हिंच, टिंडरवर टाकते. मला एक श्रीमंत बाप दे.. असं ती मुलगी पुन्हा पुन्हा म्हणताना दिसत आहे. कंटेटच्या नादात, सोशल मीडियावर कूल वाटण्यासाठी आपण आपल्या आईशी किती उद्धट आणि कोणत्या विषयावर बोलतोय, याचेही या मुलीला भान राहिले नाही.
नेटकऱ्यांचा संताप
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @Nikkiiee_d नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुलगी तिच्या आईशी मस्करी करत आहे, परंतु मस्करी करण्याची एक मर्यादा असायला हवी, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर आजकाल मुले त्यांच्या पालकांशी कसे बोलावे याचा विचार करत नाहीत अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. एका नेटकऱ्याने हा फक्त कंटेटचा भाग असल्याचे म्हणत मुलीचे समर्थनही केले आहे.
VIDEO: 'मार खायचा नाही', आगरी समाज एकवटला! 'त्या' घटनेनंतर गावागावात मिटिंग