Pune Office Girl Viral Video: रोजची धावपळ, नोकरी, व्यवसाय सांभाळता सांभाळता हल्ली आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन जाते. पुण्यासारख्या धावती जीवनशैली असणाऱ्या शहरांमध्ये तर निवांत वेळ मिळणे कठीण. मात्र तरीही आपले आरोग्य, शारिरीक स्वास्थ जपले पाहिजे, त्यासाठी कारणे देऊन चालणार नाही, असा मोलाचा संदेश देणाऱ्या तरुणीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
वेळ नाही म्हणणाऱ्यांना चपराक...
अनेकदा वेळ असूनही आळशीपणामुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तर काहीजण जॉब, व्यवसाय सांभाळून मिळेल त्या वेळेत आपल्या आरोग्याची काळजी घेतात. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील तरुणीचा असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही तरुणी ऑफिसवरुन घरी जाताना बसची वाट पाहताना त्या बस स्टॉपवरच Lunges करताना दिसत आहे.
Worlds Most Expensive egg: अबब! 'हे' आहे जगातील सर्वात महागडे अंडे? किंमतीत येतील 10 हेलिकॉप्टर
व्यायाम करण्यासाठी जीम पाहिजे, योगा क्लासला गेलं पाहिजे, असं काही नाही. वेळ मिळेल तेव्हा, जिथे असाल तिथेही तुम्ही आपल्या उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करु शकता हाच संदेश या तरुणीने दिला आहे. बस स्टॉपवर लोकांची गर्दी आहे, वाहनांची वर्दळ आहे, मात्र कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता ती मुलगी व्यायाम करताना दिसत आहे.
तब्बल 1 कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ
सध्या भारत भारत देश मधुमेहाची राजधानी बनत आहे. पुरेसा व्यायाम, योग्य पोषण आणि विश्रांतीच्या अभावामुळे लठ्ठपणा (obesity), उच्च रक्तदाब (hypertension), फॅटी लिव्हर (fatty liver) आणि हृदयविकार यांसारख्या आरोग्य समस्या वाढत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी कोणीही, कुठेही, कधीही आपला व्यायाम करु शकतो हेच या तरुणीने दाखवून दिले आहे.
दरम्यान, मकरंद वेलनेस या इन्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्यायामासाठी वेळ नाही असे म्हणणाऱ्या कुटुंबियांना, मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा. या तरुणीपासून प्रेरणा घेऊन नोकरी करणाऱ्या प्रत्येक महिलांनी आपल्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी, असं आवाहन नेटकऱ्यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world