Ajit Pawar rumor information video : २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनाला ८ दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही अजित पवारांच्या चाहत्यांना त्यांच्या निधनाचं दु:ख पचवता आलेलं नाही.
सोशल मीडियावर तर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये दादा जिवंत असल्याचे दावे केले जात आहेत. तर काहींनी हा घातपात असल्याची भीती व्यक्त केली आहे.
दादा जिवंत आहेत, त्यांना लपवून ठेवलंय; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा...
इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवारांची डीएनए टेस्ट का केली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये वापरकर्त्यांकडून वेगळेच दावे करण्यात आले आहेत. दादांच्या जीवाला धोका होता, त्यामुळे त्यांनीच हा प्लान केल्याचं सांगितलं जात आहे.
तर काही युट्यूबरनुसार अजित पवार लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार पुन्हा आले तर महाराष्ट्र आनंदी होईल. युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर अशा प्रकारचे शेकडो व्हिडिओ तयार केले जात आहेत. ज्यामध्ये अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहे.
बापमाणूस गमावल्याची खंत...
अजित पवारांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र हळहळला. जनतेतील माणूस गमावल्याची भावना सर्वांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कामाचा धडाका अफाट होता. जे मनात तेच मुखात. त्यांनी अनेकांना उभं केलं. अजित पवार शेवटपर्यंत लोकांसाठी झटले. अशा माणसाची अकाली एग्झिट चटका लावणारी आहे. त्यांच्या निधनानंतर नेतेमंडळीही ढसाढसा रडले. आजही दादा आपल्यात नाही हे सत्य स्वीकारणं अनेकांना कठीण जात आहे.
दरम्यान सोशल मीडियावर सध्या अनेक फेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्या व्हिडिओंमध्ये अजित पवार जिवंत असल्याचं सांगितलं जात आहे. खात्री जमा केल्याशिवाय अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल किंवा शेअर करू नये असंही सांगितलं जात आहे.