Viral Trend Death: भयंकर रे! टिकटॉकच्या ट्रेंडने घेतला जीव; 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; काय आहे क्रोमिंग?

सोशल मीडियाचा ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात जीव गमावल्याच्या अनेक घटना याआधी घडल्यात. अशीच एक हादरवणारी घटना इंग्लडमध्ये घडली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Viral Trend Death: आजकाल सोशल मीडिया हे जसे मनोरंजनाचे साधन बनले आहे तसेच ते आरोग्यासाठी, जिवासाठी धोकादायकही ठरत आहे. सोशल मीडियाचा अतिवापर मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहेच तितकेच त्यावरील ट्रेंडही घातक आहेत. सोशल मीडियाचा ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात जीव गमावल्याच्या अनेक घटना याआधी घडल्यात. अशीच एक हादरवणारी घटना इंग्लडमध्ये घडली आहे. 

मुलीसोबत काय घडलं?

टिकटॉकवरील धोकादायक ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना इंग्लडमध्ये घडली आहे. टायगन जारमन असं या मुलीचे नाव असून तिने क्षणाच्या नशेसाठी क्रोमिंग' (Chroming) नावाचा सोशल मीडियावरील धोकादायक ट्रेंड केला, ज्यामध्ये तिला जीव गमवावा लागला. टायगनच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Mahindra BE6 Review: 'खटारा कार, पश्चाताप होतोय...', अभिनेत्याची आनंद महिंद्रांकडे तक्रार; 4 आठवड्यातच...

​टायगनच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच तिच्या कुटुंबाने उलगडले. टायगनने 'क्रोमिंग' हा ट्रेंड केला होता. या ट्रेंडमध्ये, मुले घरातील सामान्य उत्पादने, जसे की डिओडोरंट (Deodorant) किंवा सॉल्व्हेंट-आधारित वस्तूंच्या विषारी वाफा (Toxic Fumes) श्वासामध्ये घेतात. याचा उद्देश काही क्षणांचा 'नशा' अनुभवणे हा असतो. दुर्दैवाने, हीच 'नशा' टायगनसाठी अखेरचा ठरला. ती तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि तातडीने मदत मिळूनही तिने अखेरचा श्वास घेतला.

काय आहे क्रॉमिंग ट्रेंड?

​टायगनचे सावत्र वडील, रॉब (Rob), यांनी दिलेल्या माहितीनुसार, "तिने यापूर्वी असे केले होते की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण त्या दिवशी तिने डिओडोरंटचा संपूर्ण कॅन वापरला होता. त्यांना आपल्या मुलीच्या मृत्यूचा जबर धक्का बसला आहे. ते आपल्या मुलीला 'पुकी' (Pookie) या लाडक्या नावाने हाक मारायचे. ती माझी सर्वात प्रिय, सर्वात हिंमतवान मुलगी होती, तिचे हसणे म्हणजे माझे हसणे होते.. असं म्हणत त्यांना रडु कोसळले. 

Advertisement

Shocking News: लेकीच्या हत्येसाठी पित्याला कैद, 2 महिन्यांनी 'ती' जिवंत परतली, कसा घडला चमत्कार?

दरम्यान, मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी असे ट्रेंड बंद का केले जात नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर अशा घातक ट्रेंड्सना का परवानगी दिली जाते?" इंटरनेटवरील अश्लील कंटेट ब्लॉक करतात, परंतु मुलांचे जीव घेणाऱ्या ट्रेंड्सना थांबवण्याची कोणतीही प्रक्रिया काय नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.