जाहिरात

Mahindra BE6 Review: 'खटारा कार, पश्चाताप होतोय...', अभिनेत्याची आनंद महिंद्रांकडे तक्रार; 4 आठवड्यातच...

Actor Complaint About Mahindra Car: कार खरेदी करुन अवघे चार आठवडेच झाले असताना आता या कारमध्ये प्रचंड प्रॉब्लेम असल्याचे त्याने म्हटले आहे.

Mahindra BE6 Review: 'खटारा कार, पश्चाताप होतोय...', अभिनेत्याची आनंद महिंद्रांकडे तक्रार; 4 आठवड्यातच...

Arya Babbar On complaint About Mahindra BE 6: महिंद्रा कंपनीची  इलेक्ट्रिक एसयुव्ही BE 6 या गाडीची जोरदार चर्चा होत आहे. कारच्या दमदार लूक, जबरदस्त परफॉर्मन्सने ग्राहकांना आकर्षित केले आहे. अलिकडेच महिंद्रा कंपनीने एसयूव्ही ‘BE 6' चे खास बॅटमॅन एडिशनही बाजारात आणले, जो ग्राहकांना प्रचंड आवडला. एकीकडे महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कारने सर्वांना आकर्षित केले असतानाच अभिनेता आर्य बब्बरने मात्र मी ही कार का घेतली? असे म्हणत संताप व्यक्त का घेतला आहे. 

Dhurandhar: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! पहिल्या वीकेंडची कमाई सर्वांनाच चक्रावणारी

महिंद्राची कार घेऊन पश्चाताप...

ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांचा मुलगा अभिनेता आर्य बब्बर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. अलिकडेच आर्यने  महिंद्रा BE6 SUV खरेदी केली आहे, ज्याला त्याने खास बॅटमॅन थीमही दिली होती. या कारसोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कार खरेदी करुन अवघे चार आठवडेच झाले असताना आता या कारमध्ये प्रचंड प्रॉब्लेम असल्याचे त्याने म्हटले आहे. याबाबत त्याने कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना टॅग करत एक व्हिडिओही शेअर केला आहे. 

"नमस्कार आनंद महिंद्रा सर.. माझे नाव आर्य बब्बर, मी एक कलाकार आहे. अलिकडेच मी महिंद्राची बीई ६ बॅटमॅन एडिशन ही सुंदर गाडी घेतली. पण आता मला  मी ही गाडी घेऊन खुश नसल्याचं म्हणावं लागत आहे. गाडीमध्ये इतके सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहेत मी सांगूही शकत नाही. मी गेल्या चार आठवड्यांपासून माझ्या कारचे प्रॉब्लेम सांगत आहे, मात्र सर्व्हिस सेंटरकडून कोणताही प्रतिसाद येत नाही, अशी तक्रार आर्य बब्बरने केली आहे.

Bigg Boss 19 Pranit More Earning: 'बिग बॉस' गाजवणाऱ्या प्रणित मोरेला शोमधून किती पैसे मिळाले ?

तसेच गाडीत फोन आला तर त्याचे नावही दिसत नाही. स्पीकर वाजत नाही. डिस्प्ले नीट दिसत नाही. गाडी घेऊन मला फक्त चारच आठवडे झाले आहेत. मात्र गाडीचे सॉफ्टवेअर पॉब्लेम आहेत, स्पीकर चालत नाहीत. माझ्याकडे टोयोटाची फॉर्च्युनर सात आठ वर्षांपासून होती. ती सोडून मी तुमची गाडी घेतली. आठ वर्षात मला त्या गाडीने एवढे प्रॉब्लेम दिले नाहीत जेवढे या गाडीने फक्त चार आठवड्यात दिले आहेत, असं तो म्हणत आहे. 

वरुन सुंदर, आतून खटारा...

दरम्यान, भारतीय कंपनीची, महिंद्राची गाडी घेतल्यामुळे मी खुप खूश होतो. मात्र मला आता दुःखाने म्हणावे लागत आहे की मी ही गाडी का घेतली? गाडी बाहेरुन खुप सुंदर आहे, मात्र आतून तितकीच खटारा.. अशा शब्दात आर्य बब्बरने आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com