Video : 1 सेकंद उशीर झाला असता तर... बाईकवर जाणाऱ्या बाप-मुलीवर कोसळलं प्रचंड झाड! CCTV फुटेज पाहून बसेल धक्का

Delhi Rain :झाड इतक्या अचानक पडले की दुचाकीस्वाराला सावरण्याची संधीच मिळाली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
Delhi Rain : झाड इतक्या अचानक पडले की दुचाकीस्वाराला सावरण्याची संधीच मिळाली नाही.
मुंबई:

Delhi Rain : दिल्लीमध्ये गुरुवारी सकाळपासून पाऊस सुरु आहे. या पावसाचा जनजीवनावर परिणाम झालाय. त्याचवेळी दिल्लीतील कालकाजी भागात एक धक्कादायक घटना घडली. कालकाजीमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे एक कडुलिंबाचे झाड एका बाजूला झुकले होते. अनेक वाहने त्या झाडाजवळून जात होती. त्याचवेळी, झाड हळूहळू एका बाजूला कलंडू लागले.

एवढ्यात, एक दुचाकीस्वार तेथून जात होता. परंतु, तो पुढे जाण्याआधीच झाड त्याच्या अंगावर पडले. झाड इतक्या अचानक पडले की दुचाकीस्वाराला सावरण्याची संधीच मिळाली नाही. या झाडाच्या खाली इतर काही वाहनेही आली, पण या घटनेत दुचाकीस्वाराव्यतिरिक्त इतर कोणीही जखमी झाले नाही.

व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ

अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दुचाकीवर बसलेला एक व्यक्ती आणि त्याच्या मागे बसलेली एक मुलगी अचानक झाडाखाली सापडले. झाड इतक्या वेगाने कोसळले की दोघेही खाली पडून त्याच्या खाली दबले गेले. जवळ उभे असलेले लोक आणि वाटसरू मदतीसाठी धावले. कोणीतरी झाड बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता, तर कोणी दुचाकीवरील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. पण झाड इतके जड होते की त्याला हलवणे सोपे नव्हते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मागे बसलेली मुलगी झाडाखाली अडकली होती. तिने स्वतः बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण झाडाच्या जड फांद्यांमुळे ती बाहेर येऊ शकली नाही. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळाल्यानंतर, पोलीस आणि बचाव पथक तेथे पोहोचले. खूप प्रयत्नांनंतर, दोघांना बाहेर काढण्यात आले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांवरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा : Independence Day Speech: स्वातंत्र्यदिनी शाळेत भाषण करण्यासाठी लक्षात ठेवा 10 मुद्दे, सर्व करतील तुमचं कौतुक )

Topics mentioned in this article