Viral Video on Marriage Budget: आयुष्यभराची कमाई, मुलांचे भविष्य आणि पालकांचे मोठे स्वप्न म्हणजे मुला-मुलींचे लग्न. आई वडील पै पै साठवून आपल्या मुलांचे लग्न लावतात. परंतु, अलीकडच्या काळात 'लग्न' हा एक सामाजिक सोहळ्यापेक्षा 'आर्थिक सोहळा' अधिक बनत चालला आहे. पण खरचं लग्नसोहळा इतका भव्य दिव्य दिखावा करायची गरज काय? असा विचार करायला लावणारा एक व्हिडि ओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका 5-स्टार हॉटेलमध्ये झालेल्या शाही विवाह सोहळ्याचा खर्च समोर आणत, एका व्यक्तीने हे सर्व कशासाठी? असा सवाल उपस्थित केला आहे.
4 तासांच्या लग्नात 37 लाखांचा खर्च....
या व्हायरल व्हिडिओमध्ये, 'सरजी अनफिल्टर्ड' या नावाने प्रसिद्ध असलेले विनीत बन्सल एका आलिशान विवाह सोहळ्याच्या ठिकाणी उभे राहून थेट कॅमेऱ्यात बोलत आहेत. त्यांच्या हातात या लग्न समारंभाचे अंतिम बिल आहे आणि आकडा आहे ₹ 37 लाख 40 हजार. केवळ 4 तासांच्या एका कार्यक्रमासाठी इतका मोठा खर्च, हा विषय बन्सल यांनी अतिशय संवेदनशीलतेने मांडला आहे. त्यांचा स्पष्ट सवाल आहे, "चार तासांसाठी एवढा खर्च? याऐवजी तेच पैसे जर मुलांच्या नावाने मुदत ठेव (FD) केली असती, तर जास्त मानसिक समाधान मिळाले असते."
बन्सल यांच्या मते, लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा 'इव्हेंट' (Event) असायला हवा, तो केवळ 'खर्चीक इव्हेंट' नाही. या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका थाळीची किंमत तब्बल 4000 आहे, जी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची आहे. पालकांनी वर्षानुवर्षे जपून ठेवलेली पुंजी केवळ काही तासांच्या दिखाव्यात खर्च करायची? हे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हा दिखावा कशासाठी?
आजकाल विवाह सोहळे हे 'स्टेटस सिम्बॉल' (Status Symbol) म्हणून पाहिले जातात. सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. मात्र, बन्सल यांनी उपस्थित केलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, "इतकी महागडी शादी किती दिवस टिकेल? याची कोणतीही गॅरंटी नाही." हा प्रश्न अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मनात दडलेल्या विचारांना वाचा फोडणारा ठरला.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर यावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेक नेटिझन्सनी बन्सल यांच्या मताला 100% पाठिंबा दिला आहे. . अगदी मनापासून बोलले आहेत", अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. साधेपणात जो आनंद आणि मानसिक शांती आहे, ती काही तासांच्या दिखाव्यातून मिळणाऱ्या तात्पुरत्या समाधानापेक्षा अधिक मोलाची आहे, हा विचार या व्हिडिओमधून मांडला आहे.
नक्की वाचा >> रॅपिडो बाईकवर प्रवासाला निघाली, तरुणीसोबत रस्त्यातच घडली भयंकर घटना..Viral Video पाहून सर्वच थक्क