VIDEO: मुलगी झाल्याचा आनंद तर बघा! कुटुंबियांनी केलं असं हृदयस्पर्शी स्वागत, व्हिडिओ पाहून नेटकरीही भावुक

या व्हिडिओमध्ये, "आमची लक्ष्मी आली आहे," असा मजकूरही आहे, ज्यामध्ये मुलीचे लक्ष्मीचा अवतार म्हणून स्वागत केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Daughter Birth Celebration:  आजही वंशाला दिवा पाहिजे म्हणत मुलीपेक्षा मुलगाच प्रिय असं चित्र सर्रास पाहायला मिळते. मुलगी नको म्हणत आजही गर्भातच त्यांना मारल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. एकीकडे आजही अनेकांना मुलगी नकोशी वाटत असतानाच सोशल मीडियावर एका काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुलगी झाल्यानंतर एका कुटुंबाने केलेला उत्सव अन् स्वागताच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. 

'मुलगी झाली हो' कुटुंबियाने केलं असं स्वागत

डेहराडूनमधील एका कुटुंबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी मुलगी झाल्यानंतर केलेला आनंदोत्सव आणि नवजात लेकीचे केलेलं हटके स्वागत सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचा ताफा, त्यावर गुलाबी आणि पांढरे फुले रंगवत केलेली सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. तर गाड्यांवर मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते ज्यावर मुलगी झाली आहे, असं लिहले होते. या साध्या पण हृदयस्पर्शी स्वागताने नेटकऱ्यांची मने जिंकली. 

Advertisement

Revenue Officers : शेतकरी आणि जनतेसाठी महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय, 'त्या' अधिकाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर

या खास प्रसंगाचा एक व्हिडिओ मुलीच्या आईच्या @_anandikshaa या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला. "आणि आमची हृदये भरून आली आहेत, आणि आमचे कुटुंब पूर्ण झाले आहे."  असा कॅप्शन तिने दिला आहे. व्हिडिओमध्ये कुटुंबातील सदस्य मुलीच्या स्वागतासाठी घराबाहेर जमलेले दिसत आहेत. काहींच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि ते भावूक झाले आहेत. ज्यामुळे हा क्षण अविस्मरणीय बनला आहे. या व्हिडिओमध्ये, "आमची लक्ष्मी आली आहे," असा मजकूरही आहे, ज्यामध्ये मुलीचे लक्ष्मीचा अवतार म्हणून स्वागत केले आहे.

व्हिडिओने नेटकऱ्यांचं मन जिंकलं

हा व्हिडिओ केवळ एक उत्सव नाही, तर समाजासाठी एक सकारात्मक संदेशही आहे. जिथे मुलीच्या जन्माचा सोहळा सहसा मोठ्या आनंदाने साजरा केला जात नाही, तिथे या कुटुंबाने आपला आनंद उघडपणे व्यक्त करून एक आदर्श घालून दिला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावरही खूप प्रेम मिळत आहे. तो पाहून लोक भावूक होत आहेत आणि त्या कुटुंबाचे कौतुक करत आहेत. प्रत्येक मुलीला असे कुटुंब मिळो, असं म्हणत नेटकऱ्यांनी या कुटुंबाचे कौतुक केले आहे. तर आणखी एकाने एका वडिलांसाठी यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही, अशी खास प्रतिक्रिया दिली आहे.