indigo issue viral video : आपल्या देशात प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल आणि सोयींबद्दल खूप चर्चा होत असते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अधिक भीषण होत चालली आहे. इंडिगो विमान कंपन्याच्या गोंधळामुळे देशभरातून चीड, आक्रोश आणि संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला इंडिगोचा फटका सहन करणाऱ्या प्रवाशांचा संताप लक्षात येईल. एअरपोर्टवरील एक बाप आपल्या मुलीसाठी सॅनिटरी पॅड मागताना दिसत आहेत.
धक्कादायक म्हणजे, आजूबाजूला उभे असलेले कोणीही त्याच्या मदतीला धावून येत नाही. तो कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे पॅडची मागणी करतो, मात्र यावर काहीच करू शकत नसल्याचं महिला कर्मचारी सांगत आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या एअरपोर्टच आहे, ही बाब कळू शकलेली नाही.
विमानतळावर बापाचा आक्रोश....
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, इंडिगोच्या उड्डाणाला उशीर झाल्यामुळे विमानतळावरील अनेक प्रवासी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. एका प्रवासी विमानतळावरील महिला कर्मचाऱ्याकडे आपल्या मुलीसाठी सॅनिटरी पॅडची मागणी करताना दिसत आहे. परंतु कोणीही त्याचं ऐकत नाही आणि कोणीही मदत करत नाही. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि इंडिगोच्या निष्काळजीपणावर लोक संतापले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @grafidon नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बाप म्हणतो, मला लेकीसाठी पॅड द्या...तिला खालून रक्त येतंय... मला पॅड द्या...मात्र यावर कर्मचारी काहीच मदत करू शकत नसल्याचं म्हणत आहे. यावर व्यक्ती संतापताना दिसत आहे.