आयुष्यात असे काही क्षण असतात जे सर्वसामान्य असतानाही हृदयाला स्पर्श करतात. सोशल मीडियावरील असाच एक व्हिडिओ पाहून लोक भावुक झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती आयुष्यातील पहिला विमान प्रवास करीत आहे. यावेळी त्यांच्या मनातील भीती, साधेपणा आणि कुटुंबाचं त्यांच्यावरील प्रेम स्पष्टपणे दिसत आहे.
सुनेने कॅमेऱ्यात कैद केला तो क्षण
हर्षिता नावाच्या महिलेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सासरे सुनेसोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करताना दिसत आहे. एअरपोर्टपासून विमान टेकऑफ करेपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरील भीती आणि उत्सुकता स्पष्टपणे दिसत आहे.
विमान क्रॅश नाही ना होणार?
हर्षिता सांगते, विमान उड्डाण घेत होतं तेव्हा सासरे वारंवार एकच गोष्ट विचारत होते. विमान क्रॅश तर होणार नाही ना? यावेळी हर्षिताने त्यांना प्रेमाने समजावलं आणि विमान प्रवास पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला.
पाहा Video:
अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं...
हर्षिताने सांगितल्यानुसार, तिच्या सासऱ्यांनी जीवनात खूप संघर्ष पाहिला आहे. संघर्ष केला, मेहनत केली आणि कुटुंबाचा सांभाळ केला. त्यांना आयुष्यात कधीच विमानात बसण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे कुटुंबाने त्यांची इच्छा पूर्ण केली.
सोशल मीडियावरुन कौतुक
व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर लोक भावनिक कमेंट करीत आहेत. सुनेचं कौतुक केलं जात आहे. हा व्हिडिओ कोणा सेलिब्रिटीचा नाही ना लग्जरी क्षणाचा. या अशा व्हिडिओमधून नात्यांतील ओलावा, निरागसता आणि कुटुंबाचं प्रेम दिसून येतं.