कंपनीसाठी 5 वर्ष रात्रंदिवस झटली, त्याच कंपनीच्या मिटिंगमध्ये तरुणीला आला धक्कादायक अनुभव, Video व्हायरल

ज्या कंपनीसाठी तिने साडेपाच वर्ष काम केलं, तिथून अचानक एक्झिट घेणं तिच्यासाठी खूप कठीण होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Female Employee Viral Video

Wipro Female Employee Viral Video : तुम्ही नेहमीप्रमाणे ऑफिसच्या एका मिटिंगमध्ये सामील झाले आणि काही मिनिटांतच तुम्हाला कळतं की तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं आहे..अशा परिस्थितीत तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.दिल्लीच्या एका तरुणीसोबत असंच काहीसं घडलं आहे.साडेपाच वर्षांपर्यंत विप्रो कंपनीत काम केल्यानंतर तिला अचानक सांगण्यात आलं की,आता कंपनीला तिची गरज नाही.नोकरी जाण्याचं दु:खं तर होतंच. पण जेव्हा त्या तरुणीनं म्हटलं,कदाचित हा देवाचा इशारा आहे,तेव्हा या तरुणीने अनेकांचं मन जिंकलं.हजारो लोक तिच्या भावनेचं कौतुक करत आहेत.

रुटीन मिटिंग समजली, पण आयुष्यच बदललं

दिल्लीची रहिवासी अनुकृति विद्यार्थी विप्रो कंपनीत मार्केटिंग आणि कम्युनिकेशन कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होती. 29 जून रोजी त्यांना वाटलं की, एचआर आणि मॅनेजरसोबत एक सामान्य मिटिंग होणार आहे.पण काही वेळातच त्यांना सांगण्यात आलं की,त्यांची उपस्थिती आता कंपनीला गरजेची नाही. हे ऐकून त्या तरुणीला धक्काच बसला.ज्या कंपनीसाठी तिने साडेपाच वर्ष काम केलं, तिथून अचानक एक्झिट घेणं तिच्यासाठी खूप कठीण होतं.

Advertisement

नक्की वाचा >> Palghar News : वसईत संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्तांची गाडी अडवली अन्..ऐन पावसाळ्यात नेमकं काय घडलंय?

सर्वात मोठी भीती, प्रत्येक महिन्याला पगार येणार नाही

व्हिडीओत तरुणीने म्हटलं की, नोकरी गेल्यानंतर सर्वात मोठी एकच चिंता आहे की, महिन्याला आता सॅलरी मिळणार नाही.आता पुढे दुसरी नोकरी मिळेल किंवा स्वत:चं काहीतरी काम सुरु करेल.याबाबत ती स्वत:गोंधळलेली आहे. तिने म्हटलंय की,भविष्याबाबत तिच्या मनात अनेक प्रश्न आहेत. इतकं सगळं झाल्यानंतर तरुणी नाराज झाली नाही.

तिला असं वाटतंय की, कदाचित देवच तिला तिच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा इशारा देत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हजारो लोकांनी तरुणीचं मनोबल वाढवलं. कोणीतरी म्हटलं की,हीच कठीण परिस्थिती भविष्यात नव्या यशाचं कारण बनू शकतं.अनेक यूजर्सने त्यांच्या अनुभवही शे्अर केले आणि तरुणीचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.