ISRO ची नोकरी सोडली अन् बनला कॅब ड्रायव्हर; कमाई ऐकून व्हाल थक्क

लिंक्डइन पोस्टनुसार, उथया कुमार हे त्यांच्या भावासह आता 37 कारचे मॅनेज करत आहेत. त्यांचे सर्व EMI भरण्यासाठी त्यांना फक्त तीन वर्षे शिल्लक राहिली आहेत. ते या स्टार्ट अपमधून सध्या दरवर्षी 2 कोटी रुपये कमावत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (इस्रो) अत्यंत प्रतिष्ठीत नोकरी सोडली आणि कॅब सर्व्हिसचा स्टार्ट अप सुरु केला. या व्यवसायातून कोट्यवधींची कमाई देखील होत आहे. तरुणांसाठी प्रेरणादायी असा हा प्रवास आहे उथया कुमार यांचा. उथया हे इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होते. मात्र करिअर पणाला लावून त्यांनी  एक मोठा निर्णय घेतला आणि तो यशस्वी देखील करुन दाखवला आहे. सोशल मीडियावर त्यांचं भरभरून कौतुक होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

उथया कुमार यांच्या कॅबमधून प्रवास केलेल्या रामभद्रन सुंदरन यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली होती. एका राईडदरम्यान ते उथया कुमार यांना भेटले होते. पोस्टमध्ये सुंदरन यांनी लिहिलं की "माझ्या उबेर ड्रायव्हरने स्टॅटिस्टिक्समध्ये पीएचडी केली आहे. त्यांनी ISRO मध्ये देखील नोकरी केली आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहून उथया कुमार यांनी एम.फिल., पीएचडी असं उच्च शिक्षण घेतलं आहे. 

(नक्की वाचा-  एमबीए, डॉली चहावाल्यानंतर 'मॉडेल चहावाली'चा सोशल मीडियावर धुमाकूळ; काय आहे हटके अंदाज?)

उथया कुमारचा उद्योजक होण्याचा प्रवास 2017 मध्ये काही मित्रांच्या पाठिंब्याने सुरू झाला. ज्यांनी कॅब व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे उभे केले. ही कंपनी त्यांनी त्यांचे आई-वडील सुकुमारन आणि तुलसी (ST Cab) यांच्या नावाने सुरु केली आहे. इस्रोमध्ये असताना श्री कुमार यांनी लिक्विड फ्युएलमधील बुडबुडे कमी करून त्यांची घनता टिकवून ठेवण्याचे काम केले. प्रक्षेपणाच्या वेळी होणारे स्फोट रोखण्यासाठी हे महत्वाचे आहे, असं री सुंदरम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

(नक्की वाचा-  OLA चे मालक आणि कुणाल कामरा भिडले, ई-स्कूटरवरून नेमकं काय झालं?)

लिंक्डइन पोस्टनुसार, उथया कुमार हे त्यांच्या भावासह आता 37 कारचे मॅनेज करत आहेत. त्यांचे सर्व EMI भरण्यासाठी त्यांना फक्त तीन वर्षे शिल्लक राहिली आहेत. ते या स्टार्ट अपमधून सध्या दरवर्षी 2 कोटी रुपये कमावत आहेत.

Advertisement

एका यूजरने कमेंट करत आपला अनुभव देखील शेअर केला. यूजरने लिहिलं की, "वाचून छान वाटलं. मला एकदा अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील पदवीधर उबेर ड्रायव्हरसोबत असाच अनुभव आला." 

Topics mentioned in this article