नऊरात्राची धुम संपूर्ण देशात पाहायला मिळाली. या काळात गरब्याचं आयोजन जागोजागी केल्याचं पाहायला मिळालं. गुजरातमध्ये तर नवरात्र हा सण दिवाळी पेक्षा मोठा मानला जातो. त्यामुळे गरबा आणि गुजरात याचं एक वेगळचं नातं आहे. गुजरातचा गरबा जसा चर्चेचा विषय आहे तसाच तिथला एक गरबा नाईटचा व्हिडीओ ही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. गरबा खेळतानाचा हा किसींग व्हिडीओ आहे. ज्या वेळी हा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर ते जोडपं ही अडचणीत आलं आहे.
हा व्हिडीओ वडोदरा इथला असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये एक कपल दिसत आहे. हे जोडपं अनिवासी भारतीय आहे. ते नवरात्रात गुजरातमध्ये आले होते. गरबा खेळताना त्यांनी गैरवर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. एकीकडे गरबा सुरू असता तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्याच गर्दी समोर वडोदरा येथे नवरात्री उत्सवादरम्यान हे दोघे चुंबन घेताना दिसत आहेत. गरबा खेळताना ते एकमेकाचे चुंब घेत आहे. त्यानंतर या जोडप्यावर जोरदार टीका झाली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची पोलीस तक्रार ही करण्यात आली. तक्रार झाल्यानंतर या अनिवासी भारतीय जोडप्याला माफी मागावी लागली आहे. वडोदरा शहरातील कलाली परिसरात आयोजित 'युनायटेड वे गरबा' या प्रमुख कार्यक्रमात ही घटना घडली. प्रतीक पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या चंबनाचे दृष्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायर झाले. या फुटेजमध्ये हे विवाहित जोडपे सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेताना दिसत होते. ते नुसते चुंबन घेत नव्हते तर त्यात ते गरबा ही खेळत होते.
या क्लिपमुळे तत्काळ मोठा वाद निर्माण झाला. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आणि स्थानिक गटांनी या जोडप्यावर धार्मिक उत्सवाचा अनादर केल्याचा आरोप केला. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात अशाप्रकारचे वर्तन अयोग्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. हे जोडपे मूळचे गुजरातमधील असून, अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियात राहत आहे. त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियन नागरिकत्व आहे. ते कुटुंबीयांना भेटण्यासाठी भारतात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला असून, हे जोडपे 16 वर्षांपासून विवाहित आहे. त्यांना 2 मुले आहेत. समाज माध्यमांवर झालेल्या तीव्र टीकेमुळे त्यांना अखेरीस माफी मागणे भाग पडले.