
Underworld Story: एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रदिप शर्मा यांची ओळख आहे. त्यांनी अंडरवर्ल्डमधील अनेकांना यमसदनी धाडले आहे. त्यांनी अनेक अंडरवर्ल्डच्या गुंडाना पकडलं ही आहे. त्यामुळे अंडरवर्ल्ड अनेक किस्स्यांचा खजीनाच त्यांच्याकडे आहे. त्यांनी नुकतीच NDTV ला एक खास मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी अंडरवर्ल्डमधील कधी न ऐकलेले किस्से सांगितले आहे. खास करून त्यांनी दाऊदचा छोटा भाऊ इकबाल कासकर याचा ही एक किस्सा सांगितला आहे. याच इकबालला प्रदिप शर्मा यांनी त्याच्या घरी जावून अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्यांनी अनेक गोष्टी समोर आणल्या होत्या.
प्रदिप शर्मा यांची त्यावेळी ठाण्यात नियुक्ती होती. 2017 सालची ही गोष्ट आहे. ठाणे शहर आणि ठाणे ग्रामिणमध्ये त्यावेळी खंडणीचं एक रॅकेट चाललं होतं. मोठ्या प्रमाणात खंडणी उकळली जात होती. या रॅकेटची चौकशी करताना त्याचे धागेदोरे थेट दाऊदचा छोटा भाऊ इकबाल कासकर यांच्यापर्यंत पोहोचले. इकबाल हा त्यावेळी मुंबईत वास्तव्याला होता. तो त्याच्या बहिणीच्या घरी नागपाड्याला राहात होता. तो मुंबईत राहून ठाण्यात खंडणी उकळत होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्याचे प्रदिप शर्मा यांनी ठरवले होते. त्यानुसार त्यांनी फिल्डींग लावली होती.
जास्त करून या भागात पोलीस जात नव्हते असं प्रदिप शर्मा यांनी सांगितलं. पण आपण त्याला अटक करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या घराबाहेर बरेच लोक खडा पाहारा द्यायचे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपण त्याच्या घराच्या बाहेरच आपली माणसं पेरली होती. ती पोलीस नव्हती. त्यांच्याकडून आपल्याला सर्व माहिती मिळत होती असं या मुलाखतीत शर्मा यांनी सांगितलं. त्यांनतर आम्ही टीमसह नागपाड्याला पोहोचला होता. त्यावेळी त्याच्या माणसाला आम्ही बरोबर घेतलं होतं. त्याला घेवून आम्ही त्याच्या दरवाजा पर्यंत गेल्याचं शर्मा यांनी सांगितलं.
त्याच माणसाने इकबाल कासकरच्या घराचा दरवाजा वाजवला. त्यानंतर की व्होल मधून पाहिल्यानंतर आपलाच माणूस आहे म्हटल्यावर दरवाजा उघडण्यात आला. आम्ही आतमध्ये गेलो, त्यावेळी इकबाल कासकर हा बिर्याणी खात होता. टीव्हीवर कौन बनेगा करोडपती पाहात होता असं प्रदिप शर्मा म्हणाले. ती बिर्याणी त्याने शालिमार हॉटेलमधून मागवली होती. त्यावेळी त्याला आपण म्हणाले भाई चला तुम्हाला नेण्यासाठी आलो आहे. त्यावर इकबाल म्हणाला होता बिर्याणी खाऊन घेतो असं तो म्हणाला. त्याने कोणताही विरोध केला नाही. त्यानंतर आम्ही त्याला अटक केली असं शर्मा म्हणाले.
पुढे त्याची चौकशी करतानाचा एक भन्नाट किस्सा प्रदिप शर्मा यांनी सांगितला. चौकशी दरम्यान इकबाल याने दाऊद हा पाकिस्तानमध्ये असल्याचं सांगितलं. शिवाय तो आपल्याला पाकिस्तानमधून पैसे पाठवत असल्याचंही म्हणाला. कधी कधी तो दाऊदचे फोन घेत नसे. दाऊदवर आपण रुसला आहे असं इकबाल दाखवायचा. त्यानंतर दाऊद त्याला जास्त पैसे पाठवायचा असंही इकबालने या चौकशीत सांगितलं. इकबाल कासकर हा कधी समुद्र किनारी जात नव्हता. त्याला भीती वाटायची असं त्यानेच या चौकशीत सांगितलं. त्यामागचं कारण ही मजेशीर होतं. तो म्हणाला मी जर समुद्र किनारी गेलो तर दाऊद मला बोट पाठवून किडनॅप करेल. त्यानंतर तो मला पाकिस्तानला नेईल अशी भिती त्याला होता. त्यामुळे तो समुद्र किनारी जात नव्हता असं ही त्याने चौकशी दरम्यान सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world