Gen Z Girl Viral Video : लखनऊच्या 21 वर्षीय तरुणीने फक्त नोकरीच सोडली नाही,तर राजीनामाही असा लिहिला,जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.प्रतिष्ठा गुप्ता नावाच्या तरुणीने तिच्या राजीनामा पत्रात कंपनीच्या टॉक्झिक वर्क कल्चर,कमी वेतन आणि एकाचवेळी अनेक काम करणे,अशाप्रकारच्या समस्यांचा पर्दाफाश केला आहे.ती लखनऊच्या एका कंपनीत कन्टेट मार्केंटिंग स्टॅटजिस्ट म्हणून काम करायची.तिने तिच्या राजीनाम्याचे ईमेलचे स्क्रीनशॉट्स इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. लोकांनी या व्हायरल पोस्टला वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
पण प्रतिष्ठाचा ईमेल यापेक्षा खूपच वेगळा
या महिला कर्मचाऱ्याने तिच्या कामाचा अनुभव आणि कॉर्पोरेट लाईफच्या समस्यांना स्पष्टपणे लिहिलं आहे.सामान्यपणे लोक राजीनामा देताना लिहितात की, "मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद..".पण प्रतिष्ठाचा ईमेल यापेक्षा खूपच वेगळा होता. तिने तिच्या राजीनाम्याची सुरुवातच अनोख्या अंदाजात लिहिली.तिने लिहिलं,मी हा ईमेल पाठवून माझा राजीनामा अधिकृतपणे देत आहे.आज 9 मार्च 2026 रोजी माझा शेवटचा दिवस आहे.याला माझं फायनल लॉग आऊट समजून घ्या.
नक्की वाचा >> Shirdi News: शिर्डीतील 'या' परिसरात दहशतीचं वातावरण, CCTV फुटेज समोर येताच पोलिसांची टीम हादरली
त्यानंतर तिने अशी लाईन लिहिली, जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे."खरं सांगायचं झालं तर आता सर्वकाही बिघडलं आहे.परिस्थिती खराब झाली आहे आणि मला मन:शांती तर अजिबात मिळाली नाहीय." राजीनाम्यात तिने हे सुद्धा सांगितलं की, तिला नोकरी करताना निश्चित कामापेक्षा जास्त जबाबदाऱ्या दिल्या जायच्या. पण त्यामोबदल्यात तिला खूप कमी वेतन मिळायचं.
इथे पाहा प्रतिष्ठाचा व्हायरल व्हिडीओ
तिने पुढे म्हटलं की,मी माझं रोजचं काम आणि माझं बँक बॅलेन्स पाहिलं,तेव्हा मला वाटलं की मी एकटीच पाच लोकांचं काम करत आहे. त्यानंतर प्रतिष्ठाने मजेशीर अंदाजात त्या वेगवेगळ्या जॉब रोल्सची लिस्टही पाठवली. जी त्या कंपनीत अधिकृतपदाशिवाय काम करत होती.यामध्ये व्हिडीओ एडिटिंग,ग्राफिक डिझाईन,SEO,वर्डप्रेस मॅनेजमेंट,एनालिटिक्स आणि कंटेट स्ट्रॅटजीसारखी कामे सामील होती. तिने पुढं म्हटलं, "व्हिडीए एडिटर आणि डिझायनर,म्हणजे ब्रँड पाहण्यासाठी 2005 च्या पॉवर पॉईंटसारखं वाटू नये."तिचा हा अंदाज लोकांना खूप पसंत येत आहे आणि इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
नक्की वाचा >> Kalyan News: सावधान! शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवास करताय? एक्स्प्रेसमधील प्रवाशासोबत घडलं भयंकर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world