Wedding Night: लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेव पळाला आणि 5 दिवसांनी हरिद्वारमध्ये सापडला, कारणही सांगितलं...

Wedding Night: नवरदेव लग्नाच्या पहिल्या रात्री ऐनवेळी गायब झाला. त्यानंतरत तो पाच दिवसांनी हरिद्वारमध्ये सापडला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Wedding Night: लग्नाच्या पहिल्या रात्री पळाल्याचं कारण तरुणानं सांगितलं आहे.
मुंबई:

Wedding Night: लग्न समारंभ आणि त्यामधील किस्से हे अनेकदा चर्चेचे विषय बनतात. काही लग्नामध्ये इतकं नाट्य असतं की त्याची चर्चा देशभर होते. असंच एक लग्न सध्या गाजतंय. यामधील नवरदेव लग्नाच्या पहिल्या रात्री ऐनवेळी गायब झाला. त्यानंतरत तो पाच दिवसांनी हरिद्वारमध्ये सापडला. उत्तर प्रदेशातील मेरठमधील हे विचित्र आणि नाट्यमय प्रकरण आहे. 

मोहसिन उर्फ मोनू नावाचा हा तरुण 'बल्ब' आणायला बाजारात गेला, पण घरी परतलाच नाही. यामुळे कुटुंबासह नवी नवरीही चिंतेत होती. पोलिसांनी त्याला शोधून काढल्यावर, त्याने जे कारण सांगितले, त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले.

काय आहे प्रकरण?

सरधना येथील रहिवासी असलेल्या मोहसीन उर्फ मोनूचे लग्न मुजफ्फरनगरच्या खतौली येथील एका तरुणीशी 26 नोव्हेंबर रोजी लग्न झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी तो वधूला त्याच्या घरी घेऊन आला.संध्याकाळी घरात त्यांच्या पहिल्या रात्रीची तयारी सुरु होती. नवरीने खोलीत हलकी रोषणाई (dim light) करणारा बल्ब लावण्याची इच्छा व्यक्त केली.

( नक्की वाचा : Cab Driver : 'भैय्या' म्हणू नका... ' कॅब ड्रायव्हरने कारमध्ये प्रवाशांसाठी लावले 6 'कडक' नियम, चर्चा तर होणारच )

मोहसिन बल्ब आणण्यासाठी म्हणून बाजारात गेला, पण त्यानंतर तो परतलाच नाही. खास तयार करण्यात आलेल्या पलंगावर तिच्या पतीची वाट बघत राहिली, तर दुसरीकडे संपूर्ण कुटुंबात चिंतेचे वातावरण पसरले.

Advertisement

तपास आणि पोलिसांची धावपळ

नवरदेव रातोरात गायब झाल्याने दुसऱ्याच दिवशी कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये मोहसीन बेपत्ता असल्याची तक्रार केली. यावेळी पोलिसांना तपासादरम्यान पोलिसांना गंगनहरजवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोहसिन रात्रीच्या वेळी पुलाच्या दिशेने जाताना दिसला. या ठिकाणी अनेकदा आत्महत्यांच्या घटना घडल्या असल्याने कुटुंबाची चिंता अधिक वाढली

मोहसिनने गंगनहरमध्ये उडी मारली असावी,या शक्यतेने तपास यंत्रणेनं गंगनहर पुलापासून नानू पुलापर्यंत नदीच्या कडा आणि खोल पाण्यात त्याचा कसून शोध घेतला, परंतु तो सापडला नाही.

Advertisement

पोलिसांनी तपास सुरू ठेवला आणि अखेर त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले. तेव्हा त्याचा मोबाईल हरिद्वारमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीनं एक पथक हरिद्वारला रवाना झाले.

( नक्की वाचा : Trending News: पाणीपुरी खाण्यासाठी महिलेनं तोंड उघडलं आणि उघडंच राहिलं... डॉक्टरांनाही मोठा धक्का! म्हणाले... )

काय होते कारण?

हरिद्वारमध्ये मोहसीन पोलिसांना रस्त्यावर एकटाच फिरताना मिळाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मेरठला आणले. मोहसिनने पोलिसांना दिलेल्या जबाबात, तो गायब होण्याचे कारण सांगितले आहे.

Advertisement

"मी लग्नाच्या पहिल्या रात्री खूप नर्व्हस झालो होतो. भीती आणि तणावामुळे मी डिप्रेशनमध्ये (Depression) गेलो आणि घरातून पळून आलो. मला कळालेच नाही की मी हरिद्वारला कधी आणि कसा पोहोचलो, असे कारण त्यानं सांगितले.

मोहसिनने लग्नात खूप आनंदी दिसत होता, तसेच त्याच्या आई-वडिलांनीही लग्नासाठी कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट केले होते. मोहसिनच्या संमतीनेच ही प्रक्रिया पुढे गेली होती. त्यामुळे अचानक आलेला 'नर्व्हसनेस' आणि 'डिप्रेशन'चा दावा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

मोहसिन घरी परतताच त्याच्या आईने त्याला मिठी मारली. सलग पाच दिवसांच्या शोधमोहिमेनंतर आणि संभाव्य संकटातून तो सुरक्षित परतल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांनी मोहसिनचे वडील आणि सासरच्या लोकांनाही हरिद्वारला सोबत नेले होते. या घटनेमुळे काही काळ कुटुंब आणि नवीन नवरी दोघांनाही खूप त्रास झाला होता.

Topics mentioned in this article