GST Notice To Pani Puri Seller: रस्त्यावर फास्ट फूड विकणाऱ्यांची कमाई किती असेल यानी नेहमीच उत्सुकता असते. तामिळनाडूतील एका पाणीपुरीवाल्याची कमाई सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या पाणीपुरी विक्रेत्याला जीएसटी विभागाने नोटीस धाडली आहे. कारण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या पाणीपुरी विक्रेत्याने तब्बल 40 लाख रुपयांची कमाई केली आहे.
सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु होत आहे. जीएसटी अधिनियमानुसार ज्या व्यवसायांची वार्षिक कमाई 40 लाखांहून अधिक असते त्यांना जीएसटी नोंदणी करणे अनिवार्य असते.
मीडिया रिपोर्टनुसार, या पाणीपुरी विक्रेत्याला 17 डिसेंबर 2024 रोजी तामिळनाडू जीएसटी कायदा आणि केंद्रीय जीएसटी कायद्यांतर्गत समन्स बजावण्यात आली होते. अधिकाऱ्यांनी विक्रेत्याला प्रत्यक्ष उपस्थित राहून गेल्या तीन वर्षांचे आर्थिक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या तपासाचा केंद्रबिंदू प्रामुख्याने डिजिटल व्यवहारांद्वारे मिळणारे मोठे पेमेंट आहे.
या घटनेनंतर इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. पाणीपुरी विक्रेत्याची 40 लाख रुपये ही फक्त मिळालेली रक्कम आहे, निव्वळ नफा नाही. तसेच काही लोकांनी असाही अंदाज लावला की जर डिजिटल पेमेंटद्वारे या विक्रेत्याने 40 लाख रुपये असेल तर रोख पेमेंट देखील मोठ्या प्रमाणात असेल.
कॉर्पोरेट नोकरीपेक्षा पाणीपुरीचा व्यवसाय चांगला आहे. याशिवाय, या व्यवसायात कामाचे तास निश्चित आहेत आणि सुट्टीचे कोणतेही बंधन नाही, अशीही कमेंट एकाने केली आहे.