Guitar Bride Video Viral : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे,ज्यामध्ये नवी नवरी डोक्यावर पदर घेत फक्त गाणेच गात नाही,तर अप्रतिम गिटारही वाजवत आहे.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक तिला ‘गिटार वाली बहू'म्हणून ओळखू लागले आहेत.तिचा सुरेल आवाज आणि आत्मविश्वास पाहून प्रत्येकजण तिची प्रशंसा करत आहे. तान्या सिंग असं या नवख्या नवरीचं नाव आहे.तान्या मूळची एटा येथील आहे आणि सध्या सहारनपूरच्या मुन्नालाल देवी डिग्री कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.
कोण आहे 'गिटारवाली बहू'?
या व्हायरल सुनेचे नाव तान्या सिंह असून, ती मूळच्या उत्तर प्रदेशातील एटा येथील आहे. सध्या ती सहारनपूरच्या मुन्नालाल देवी डिग्री कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तान्याचे लग्न नुकतेच गाझियाबादच्या मोदीनगर भागातील मोहम्मदपूर कदीम येथील रहिवासी असलेल्या आदित्य गौतम यांच्याशी झाले आहे. हा व्हिडिओ 30 नोव्हेंबर 2025 रोजी महिला संगीताच्या वेळी रेकॉर्ड करण्यात आला होता.
नक्की वाचा >> गुड न्यूज! LIC च्या 2 नव्या स्कीम लॉन्च, विम्यासोबतच सेव्हिंग अन् 2 कोटींपर्यंत होणार फायदा
इथे पाहा नव्या नवरीचा व्हायरल व्हिडीओ
तान्याने सांगितलं की, लग्नाच्या विधीदरम्यान महिला पारंपरिक गाणी गात होत्या. सुरुवातीला ढोलकवर गाणे गायल्यानंतर पती आदित्यच्या सांगण्यावरून तिने गिटार हातात घेतले. तान्याने 'एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे'* हे गाणं सुरू करताच, आजूबाजूला बसलेल्या महिलांनी तो सुंदर क्षण लगेच रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला.विशेष म्हणजे, तान्याने गिटारचे शिक्षण घेतले नाही. कोविड लॉकडाऊनच्या काळात, भावाचे गिटार आणि यूट्यूब व्हिडिओच्या मदतीने तिने स्वतःच गिटार वाजवण्याचा अभ्यास सुरू केला.
नक्की वाचा >> याड लागलं रं..! अंधेरीत स्टार अभिनेत्रीनं मध्यरात्री नको ते केलं, पोलिसांची उडाली झोप, Video व्हायरल
याच गिटारने त्यांना आज देशभरात ओळख मिळवून दिली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी पदरावरून चर्चा सुरू केली. त्यावर तान्याने स्पष्ट केले की, तो जुनाट विचार किंवा सक्ती नव्हती, तर ती वधूची ओळख असते. त्यांना स्वतःला नववधू म्हणून सर्व विधी पूर्ण करायचे होते. तान्याचे पती आदित्य गौतम सहारनपूरमध्ये वीज विभागात एसडीओ (SDO) म्हणून कार्यरत आहेत. 28 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा अगदी साधेपणाने विवाहसोहळा पार पडला. तान्या यांना आता पती आदित्य आणि कुटुंबांचे पूर्ण समर्थन मिळत आहे.