Actress Megha Kaur Viral Video : गायिका,अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर मेघा कौर सध्या तिच्या कोणत्याही म्युझिक,व्हिडिओ किंवा चित्रपटामुळे नाही,तर एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ मुंबईतील लोखंडवाला बॅक रोडचा असल्याचं सांगितलं जात आहे,जिथे मेघा कौर कारमधून खाली उतरून जीवघेणी स्टंट करताना दिसत आहे.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली आहे.मुंबई पोलिसांनीही अभिनेत्रीविरुद्ध कारवाई केली आहे.
त्यानंतर अभिनेत्रीनं या व्हिडीओबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे. अंधेरीच्या रस्त्यावर कौरने केलेली धोकादायक स्टंटबाजी इंटरनेटवर चर्चेचा मुद्दा बनला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अभिनेत्री कौरवर टीकेची झोड उठवली आहे. मेघा कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्राम अकाउंटवर ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.नुकतच तिने धोकादायक कार स्टंटचा एक व्हिडिओ शेअर केला,ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
व्हिडिओमध्ये मेघा धावत्या कारमधून रस्त्यावर खाली उतरते आणि जीवाला धोका निर्माण होईल, अशी स्टंटबाजी करते. कौरने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने नेटकऱ्यांनी तिला चांगलच सुनावलं आहे. तसच पोलिसांनीही कौरला खाकीचा दणका दाखवला आहे. कौरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हे प्रकरण सोशल प्लॅटफॉर्मवर पोहोचताच मुंबई पोलिसही सक्रिय झाले आणि त्यांनी व्हिडिओची चौकशी सुरू केली. पोलिसांच्या माहितीनुसार,ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे.
व्हिडीओ शेअर करत मेघा कौरने कॅप्शनमध्ये काय लिहिलं?
हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "माझी विनंती आहे की हे करायचा प्रयत्न करू नका." या प्रकरणावर आता मेघानेही स्पष्टीकरण दिले आहे.तिने इन्स्टाग्राम व्हिडिओ बनवण्यामागचे कारण सांगत आपली बाजू मांडली आहे.तसेच एका व्यक्तीवर नाराजीही व्यक्त केली आहे. कौरने असं म्हटलं आहे की,"हॅलो,मी एक अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर आहे.हा व्हिडिओ मी फक्त कंटेंटसाठी शूट केला होता आणि अशा ठिकाणी केला होता,जिथे लोक उपस्थित नव्हते.ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणे किंवा कोणाला चुकीचा संदेश देणे, असा माझा उद्देश अजिबात नव्हता."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world