Today Trending News : जगात सर्वाधिक हिंदू भारतात राहतात. तर याबाबत नेपाळ दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, जो एक हिंदूबहुल देश आहे.पण तिसऱ्या क्रमांकावर जो देश आहे,जो अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे. बांगलादेश,जो एक मुस्लिमबहुल राष्ट्र आहे,तिथे हिंदू आजही एक धार्मिक अल्पसंख्याक म्हणून राहतात. बांगलादेशात हिंदूंची उपस्थिती ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक दशकांपासून या देशात अशा गोष्टी सुरु आहेत. तसच हे सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. तरीदेखील,बदलत्या परिस्थितीनुसार त्यांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याची नोंद आहे.
बांगलादेशच्या 2022 च्या जनगणनेनुसार,देशाची एकूण लोकसंख्या जवळपास 16.5 कोटी आहे. ज्यामध्ये अंदाजे 7.95 टक्के म्हणजेच सुमारे 1.3 कोटी लोक हिंदू आहेत.याच्या तुलनेत बौद्ध आणि ख्रिश्चन समुदाय मिळूनही देशाच्या लोकसंख्येच्या 1 टक्क्यांपेक्षा कमी आहेत.जरी हिंदू संपूर्ण बांगलादेशात विखुरलेले असले तरी काही जिल्ह्यांमध्ये त्यांचा वाटा अधिक आहे.ढाका विभागातील गोपालगंज जिल्ह्यात हिंदू लोकसंख्या सुमारे 26.94 टक्के आहे. सिल्हेट विभागातील मौलवीबाजारमध्ये 24.44 टक्के आणि रंगपूर विभागातील ठाकुरगावमध्ये 22.11 टक्के हिंदू राहतात. खुलना जिल्ह्यात तर प्रत्येक पाचवा व्यक्ती हिंदू समुदायातील आहे.
नक्की वाचा >> Domibivali News: काटई नाक्याजवळ MIDC ची मोठी जलवाहिनी फुटली! शहरात पाणी टंचाई होणार? Video पाहून धक्काच बसेल
1901 पासून आतापर्यंतच्या प्रत्येक जनगणनेत हिंदूंचा वाटा कमी
बांगलादेशातील हिंदू लोकसंख्येत घट होणे, ही नवीन गोष्ट नाही. 1901 पासून आतापर्यंतच्या प्रत्येक जनगणनेत हिंदूंचा वाटा कमी होताना दिसला आहे. सर्वात मोठी घट 1941 ते 1974 दरम्यान झाली, जेव्हा हा प्रदेश पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता. फक्त गेल्या एका दशकातच हिंदू लोकसंख्येत 0.59 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. बांगलादेश ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, खुलना विभागात सर्वाधिक म्हणजे 1.33 टक्क्यांची घट झाली आहे.
नक्की वाचा >> Navi Mumbai : मार्केटला जाण्याआधी सावध व्हा! नवी मुंबईत बुर्का गँगची एन्ट्री, सीवूडमध्ये सशस्त्र दरोडा, Video
हिंदूंनी बांगलादेश सोडून भारत आणि इतर देशांकडे..
इतिहासकार ज्ञानेश कुदैसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या फाळणीनंतर अविभाजित बंगालमधील जवळपास 42 टक्के हिंदू,म्हणजेच अंदाजे 1.14 कोटी लोक पूर्व बंगालमध्येच राहिले होते.पण बदलत्या परिस्थितीनुसार मोठ्या प्रमाणात हिंदूंनी बांगलादेश सोडून भारत आणि इतर देशांकडे स्थलांतर केले. दुसरीकडे राजकीय घडामोडींनीही चिंता वाढवली आहे.ऑगस्ट 2024 मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन भारतात गेल्यानंतर त्यांच्या समर्थकांवर हल्ल्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या.बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलच्या माहितीनुसार 5 ऑगस्टनंतर सुमारे 50 जिल्ह्यांमध्ये 200 पेक्षा जास्त हल्ल्यांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या.