जाहिरात

Navi Mumbai : मार्केटला जाण्याआधी सावध व्हा! नवी मुंबईत बुर्का गँगची एन्ट्री, सीवूडमध्ये सशस्त्र दरोडा, Video

नवी मुंबईतील सीवूड परिसरात एका ज्वेलरी दुकानावर सशस्त्र दरोड्याची खळबळजनक घटना सोमवारी भरदिवसा घडली.बंदुकीचा धाक दाखवत अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकला. थरारक सीसीटीव्ही व्हायरल..

Navi Mumbai : मार्केटला जाण्याआधी सावध व्हा! नवी मुंबईत बुर्का गँगची एन्ट्री, सीवूडमध्ये सशस्त्र दरोडा, Video
Navi Mumbai Gold Robbery Video
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Robbery CCTV Video : नवी मुंबईतील सीवूड परिसरात एका ज्वेलरी दुकानावर सशस्त्र दरोड्याची खळबळजनक घटना सोमवारी भरदिवसा घडली.बंदुकीचा धाक दाखवत अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने लुटले आणि चोरटे घटनास्थळावरून फरार झाले. दरोड्याची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन आरोपी बुर्का परिधान करून दुकानात आले. सुरुवातीला या चोरट्यांचा कुणालाही संशय आला नाही. चोरटे थेट काउंटरजवळ गेले. त्यानंतर अचानक त्यांनी शस्त्र दाखवत दुकानदार व कर्मचाऱ्यांना धमकावले आणि काउंटरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लुटले. या वेळी त्यांचा एक साथीदार दुकानाबाहेर उभा राहून नजर ठेवून होता.जेणेकरून कोणाला संशय आल्यास त्वरित पळ काढता येईल.
या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात आरोपी स्पष्टपणे कैद झाले आहेत. 

नक्की वाचा >> पत्नीसोबत बुलेट राईड..CSK ने शेअर केला फोटो, T-20 वर्ल्डकपही खेळणार, स्टार क्रिकेटरला तुम्ही ओळखलं का?

दरोडेखोरांचा थरारक सीसीटीव्ही होतोय व्हायरल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरात नाकाबंदी केली आहे.आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चोरट्यांनी किती रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले?याबाबतचा तपशील समोर आलेला नाही. या घटनेमुळे सीवूडसह परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचा दावा केला आहे.

नक्की वाचा >> Navi Mumbai: अजित पवारांना मोठा धक्का; CIDCO माजी संचालकांनी घेतला मोठा निर्णय? एका फोटोमुळे राजकारण तापणार

“सीवूड परिसरातील ज्वेलरी दुकानावर सशस्त्र दरोड्याची घटना घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल.”, अशी माहिती नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com