Marathi Rickshaw Driver Video: मुंबई- पुण्यासारख्या शहरांमध्ये रिक्षा चालकांची दादागिरी, फसवणुकीचे प्रकार वारंवार पाहायला मिळतात. शहरात नव्याने गेलेल्या ग्राहकांची तर तिकिटांचे वाढते दर सांगून अक्षरश: लूट केली जाते. अशातच सोशल मीडियावर सध्या एका रिक्षाचालकाच्या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामधील त्याचा प्रामणिकपणा पाहून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. नेमका काय आहे हा व्हिडिओ? वाचा...
सध्या सोशल मीडियाचा काळ आहे. दैनंदिन जिवनातील असंख्य घडामोडी, किस्से सोशल मीडियावर शेअर केले जातात. सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर त्याच्या प्रामणिकपणाचे नेटकरी कौतुक करत आहेत.
Kristin Cabot : प्रसिद्ध कंपनीच्या CEO सोबत Live रोमान्स करताना सापडलेल्या क्रिस्टिन कॅबोट कोण आहेत?
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मराठी रिक्षाचालक परदेशी प्रवाशासोबत भाड्यावरुन चर्चा करताना दिसत आहे. तो प्रवासी विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी किती रुपये होतील? अशी विचारणा करतो. त्यानंतर रिक्षाचालक २२ किमीचे 500 रुपये होतील असं सांगतो. मात्र त्या प्रवाशाला रिक्षाचालकाने 5000 रुपये भाडे सांगितले असे वाटते.
तो परदेशी प्रवासी तात्काळ खिशातील पैसे काढून माझ्याकडे चार हजार रुपये आहेत, असं सांगतो आणि त्याला पैसे देतो. मात्र तो रिक्षाचालक प्रामणिकपणे मला 500 रुपये पाहिजेत. त्यामधील फक्त एक नोट द्या, असं सांगतो. दोघांमधील हा संवाद एका कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून ज्याचा व्हिडिओ आता माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.
heyalex या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर केलेला हा व्हिडिओ हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. प्रत्येकाने असा प्रामणिकपणा दाखवावा असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने त्या रिक्षावाल्याच्या शर्टवर छत्रपती शिवरायांचा फोटो छापला आहे तो फसवू शकत नाही, असं म्हणत खास कौतुक केले आहे. तर आणखी एकाने फुकटचे 5000 पेक्षा कष्टाच्या 500 रुपयांची किंमत जास्त आहे, अशी खास प्रतिक्रिया दिली आहे.