4 स्टार हॉटेलच्या रुममध्ये CCTV, कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड केला! 'त्याने' डोळ्यादेखत पाहिलं अन्..

एका फोअर स्टार हॉटेलच्या रुममध्ये कॅमेरा बसवून कपलचा खासगी व्हिडीओ लीक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका व्यक्तीचा तो व्हिडीओ पाहून थक्कच व्हाल.

जाहिरात
Read Time: 2 mins
Couple Private Video Viral
मुंबई:

CCTV Camera In Hotel Room :  एखाद्याच्या खासगी जीवनाचं रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणे, हा गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलमांनुसार यासाठी शिक्षेची तरतूद आहे.पण काही विकृत प्रवृत्तीचे लोक असं काही करतात,ज्यामुळे सभ्य लोकांचं जगणं कठीण होतं. एका व्यक्तीने अशाच प्रकारची घटना डोळ्यादेखत पाहिली, ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. या व्यक्तीने या घटनेबद्दल असं काही सांगितलं आहे, जे ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रुममध्ये कॅमेरा लावला आणि..

व्हिडीओत तो व्यक्ती सांगतो की, तो दिल्लीहून परत आला होता आणि दिल्लीतील एका हॉटेलच्या बाहेर उभा होता.ज्या हॉटेलमध्ये त्याने चेक-इन केले होते,त्याच हॉटेलमध्ये एक कपल आले होते.कदाचित ते विवाहित होते आणि हनीमूनसाठी आले होते आणि हे 4 स्टार हॉटेल होते.पण त्यांच्या बेडरूममध्ये हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी कॅमेरा लावला होता.त्या व्यक्तीने पुढे व्हिडिओमध्ये म्हटलंय की, कॅमेरा लावल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर हॉटेलच्या बाहेर पोलीस जमले. हॉटेलचे लोक इतके विकृत होते की, त्यांनी कपलचे खासगी क्षण सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड करून ते फुटेज इंटरनेटवर व्हायरल केले. 

नक्की वाचा >>  वाशीच्या मधुबन बारवर पोलिसांची धाड, 9 महिला अन् 5 पुरुष..मध्यरात्री 1 वाजता काय सुरु होतं?

रुममध्ये ते गाणं वाजलं अन् कपलला मोठा दिलासा मिळाला

‘ते कपल इतके रडत होते,इतके लाजत होते की पोलिसांनाही काय करावे हे समजत नव्हते.सायबर सेलनेही या घटनेची दखल घेतली.पण दिलासादायक बाब म्हणजे, जेव्हा हे कपल कॅमेरात कैद झाले होते, तेव्हा त्यांच्या रुममध्ये जुबिन नौटियालचं गाणं लावण्यात आलं होतं.जसं हे फुटेज यूट्यूबर टाकण्यात आलं, त्यानंतर लगेच स्ट्राईक आला.

Advertisement

नक्की वाचा >> 'स्मृती मंधानाच्या हातात एंगेजमेंट रिंग नाही',लग्न रद्द झाल्याच्या चर्चांनंतर इन्स्टाग्रामवर टाकला पहिला Video

दरम्यान, कपलने बुक केलेल्या हॉटेल रूममध्ये CCTV लावणे आणि त्याचे फुटेज व्हायरल करणे हे बीएनएसच्या कलम 77 आणि IT Act 66E अंतर्गत गंभीर दंडनीय गुन्हा आहे. ज्यामध्ये 3 ते 7 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि मोठा दंड होऊ शकतो. जर खाजगी व्हिडिओ कोणी लीक केला असेल, तर तक्रार नोंदवा. तसेच https://cybercrime.gov.in वरही तक्रार नोंदवा. पोलीस थेट प्लॅटफॉर्मला टेकडाउन नोटीस पाठवून व्हिडिओ हटवू शकतात.