जाहिरात

Navi Mumbai News: वाशीच्या मधुबन बारवर पोलिसांची धाड, 9 महिला अन् 5 पुरुष..मध्यरात्री 1 वाजता काय सुरु होतं?

नवी मुंबई वाशीच्या सेक्टर 17 मधील मधुबान बारवर पोलिसांनी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास छापा टाकला. या ठिकाणी ग्राहकांसोबत अश्लील चाळे सुरू असल्याची खबर पोलिसांनी लागली होती.

Navi Mumbai News: वाशीच्या मधुबन बारवर पोलिसांची धाड, 9 महिला अन् 5 पुरुष..मध्यरात्री 1 वाजता काय सुरु होतं?
Police Raid At Vashi Madhuban Bar
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Crime News Today :  नवी मुंबई वाशीच्या सेक्टर 17 मधील मधुबान बारवर पोलिसांनी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास छापा टाकला. या ठिकाणी ग्राहकांसोबत अश्लील चाळे सुरू असल्याची खबर पोलिसांनी लागली होती. त्यानंतर पोलिसांनी या बारवर धडक कारवाई करून 9 महिलांसह 5 पुरुष कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. आरोपी महिला वेटर आणि गायक म्हणून या बारमध्ये काम करायच्या. पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. आरोपी आपापसातील सहमतीने ग्राहकांसोबत अश्लील कृत्य करत होते, असा आरोप केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आरोपी महिला वेटर आणि गायक, तर इतर 5 पुरुष आरोपींमध्ये ते मॅनेजर आणि वेटरचा काम करायचे.बारमधील पुरुष कर्मचारी हे आर्थिक फायद्यासाठी असं कृत्य करायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व १४ जणांविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> 'स्मृती मंधानाच्या हातात एंगेजमेंट रिंग नाही',लग्न रद्द झाल्याच्या चर्चांनंतर इन्स्टाग्रामवर टाकला पहिला Video

नवी मुंबईतील बार संस्कृती कधी थांबणार?

नवी मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांत बारची संख्या झपाट्याने वाढली असून नाईट लाईफच्या नावाखाली अनेक ठिकाणी बेकायदेशीर डान्सबार सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत सुरू असतात,असं नागरिकांचं म्हणणं आहे. विशेषतः वाशी सेक्टर-17 हा परिसर तळीमारांचा मुख्य अड्डा झाल्याचंही येथील नागरिक सांगतात. रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीर धंदे,दारू पिऊन टिंगल-टवाळी,भांडणे अशा घटना या बारमध्ये घडत असल्याचं म्हटलं जात आहे.

नक्की वाचा >> Video: सिगारेटच्या लायटरने अगरबत्ती-दिवा पेटवायचा की नाही? भक्ताच्या प्रश्नाला अनिरुद्धाचार्याचं भन्नाट उत्तर

नागरिकांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर ढाब्यांची संख्या वाढत असून या ठिकाणी हाणामारी,दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालण्याच्या घटना वाढल्या आहेत. या गंभीर समस्यांबाबत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “यावर वाशी पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई का करत नाही?”, अशा बार व ढाब्यांना परवानगी कोण देतो? ते कोणाच्या पाठबळावर चालतात? या परिस्थितीमागे कोणाचा आर्थिक स्वार्थ आहे. या सर्व मुद्द्यांबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.नवी मुंबई वाशीतील माधुबन बारवरील छाप्यानंतर नवी मुंबईतील बेकायदेशीर बार ऑपरेशन्स, नाईट लाईफ आणि तळीमार संस्कृतीवर पोलीस व प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com