जाहिरात

Viral Video : फ्रेंच फ्राईज पाहिल्यावर तुमच्याही तोंडाला पाणी सुटतं? 'हा' व्हिडीओ बघितल्यावर कधीच खाणार नाहीत

फ्रेंच फ्राईज खायला टेस्टी लागतात, पण ते खाल्ल्याने आरोग्याचं किती नुकसान होतं, याचा तुम्ही विचारही केला नसेल. फ्रेंच फ्राईज बनवण्याची अशी पद्धत कधीच पाहिली नसेल. व्हायरल व्हिडीओ पाहून धक्काच बसेल.

Viral Video :  फ्रेंच फ्राईज पाहिल्यावर तुमच्याही तोंडाला पाणी सुटतं? 'हा' व्हिडीओ बघितल्यावर कधीच खाणार नाहीत
French Fries Making Viral Video

French Fries Viral Video :  फ्रेंच फ्राईज खायला टेस्टी लागतात, पण ते खाल्ल्याने आरोग्याचं किती नुकसान होतं, याचा तुम्ही विचारही केला नसेल. कारण ज्या घाणेरड्या पद्धतीने फ्रेंज फ्राईज बनवले जातात, ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या कंपनीत अशाप्रकारची पद्धत वापरली जात नसेल,अशी अपेक्षा आहे.पण छोट्या मोठ्या दुकानांमध्ये विक्री होणारे फ्रेंज फ्राईज प्रश्नांच्या घेऱ्यात सापडले आहेत. कारण टपरीवर कोणत्याही प्रकारचं हायजिन मेंटेन ठेवलं जात नाही. अशाचप्रकारचा फ्रेंज फ्राईज बनवण्याचा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत पाहू शकता की, एका नीळ्या ड्रम ज्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.तसच जिथे तो ड्रम ठेवला आहे, तिथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे.एक व्यक्ती बटाट्याचे तुकडे त्या ड्रममध्ये फेकतो आणि हँडलने तो ड्रम फिरवतो.मागच्या बाजूनेही एक व्यक्ती नीळ्या ड्रमला गोल गोल फिरवत आहे. तर दुसरा व्यक्ती नीळ्या ड्रम मध्ये असलेल्या फ्रेंच फ्राईजवर मीठ आणि मसाले टाकून फ्रेंच फ्राईज तयार करत असतो.जेव्हा फ्राईज शिजतात, तेव्हा त्या फ्राईजला नीळ्या ड्रममधून बाहेर काढलं जातं. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी संताप व्यक्त केला आहे. 

नक्की वाचा >> Akola News : अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ, 'हा' परिसर टार्गेटवर? गुपचूप केली कारची चोरी, पाहा CCTV व्हिडीओ

फूड पॉएजनिंग होण्याची शक्यता

जर तुम्ही अशाप्रकारचे फ्रेंच फ्राईज खात असाल, तर आरोग्यावर याचे किती विपरीत परिणाम होतील, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पण अशा वातावरणात तयार केलेले फ्रेंच फ्राईज दिर्घकाळ तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरतात. फ्रेंच फ्राईजचं साहित्य खुल्या प्लास्टिक ड्रममध्ये फेकले जातात. त्यानंतर एक व्यक्ती त्यात मीठ आणि मसाले मिक्स करतो. पण त्या व्यक्तीने ग्लोव्ज घातलेले नसतात. ज्या ठिकाणी फ्रेंज फ्राईज बनवतात,त्या परिसरात खूप अस्वच्छता असते. असे फ्रेंच फ्राईज खाल्ल्याने फूड पॉएजनिंग होण्याची शक्यता जास्त असते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com