VIDEO: पाऊस आल्यावर कपडे कसे काढावे? करिश्माने दाखवलं, 2 लाख लोकांनी पाहिलं.. व्हिडिओने घातला धुमाकूळ

करिश्मा धीरज नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे रील शेअर करण्यात आलं आहे. या महिलेची भन्नाट क्रिएटीव्हिटी पाहून नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

जाहिरात
Read Time: 2 mins

Viral Video: सध्याचं युग सोशल मीडियाचं आहे. सोशल मीडियावर असंख्य कंटेट क्रिएटर्स आपली कला दाखवत असतात. सोशल मीडियावरील रीलस्टारकोणता अन् काय कंटेट तयार करतील ह्याचा काही नेम नाही. कोणी भन्नाट डान्स, कोणी खतरनाक प्रॅन्क तर कोणी वेगवेगळ्या टीप्स, माहिती देणारे व्हिडिओ बनवून नेटकऱ्यांचं मनोरंजन करत असतात. अशातच इन्स्टाग्रामवर सध्या एका महिलेच्या व्हायरल कंटेटने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये पाऊस आल्यावर कपडे कसे काढायचे? याबाबतचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आहे जे पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. 

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. सतत पावसाची संततधार सुरु आहे. अशावेळी अनेकदा घराबाहेर सुकत घातलेले कपडे आपण काढायचे विसरुन जातो. याचबाबत आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये पाऊस आल्यानंतर कपडे कसे काढायचे हे दाखवण्यात आलंय. हो हे खरं आहे. करिश्मा धीरज नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे रील शेअर करण्यात आलं आहे. या महिलेची भन्नाट क्रिएटीव्हिटी पाहून नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Advertisement

Schemes for Girls: लाडक्या लेकीचं भविष्य करा सुरक्षित! 5 जबरदस्त सरकारी योजना; कसा होतो फायदा? वाचा..

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला बेडवर बसली आहे आणि पाऊस आल्यानंतर कपडे कसे काढायचे? याबाबत मार्गदर्शन करत आहे. बेडवरुन ती उठते अन् खिडकीत सुकत घातलेली कपडे काढून आणते. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसावं की रडावं? असा प्रश्न पडला आहे.

नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून आत्तापर्यंत त्याला २ लाख ९७ हजार व्हिव्ह्यूज मिळाले आहेत. तसेच आता हेच बघायचं राहिलेलं म्हणत नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. दरम्यान, करीश्मा या साडीवाल्या काकू म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. साडी नेसून नवऱ्याशी कसं भांडायचं? साडी नेसून छत्री कशी पकडायची? अशा अजब-गजब विषयांवर त्या कंटेट तयार करतात. त्यांच्या या रीलचीही सध्या तुफान चर्चा सुरु आहे. 

How to Get Rid of Frogs:पावसामुळे घरात बेडूक येतोय? न मारता 'असे' दूर पळवा; 'या' वासाने होतील गायब!