Hyderabad badminton Player heart Attack Viral Video: अलिकडच्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः तरुणाईमध्ये हे हृदयविकाराच्या धक्क्याचे प्रमाण जासत दिसत आहे. अगदी खेळता खेळता, जीममध्ये वर्कआऊट करतानाही हृदयविकारच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत ज्याचे व्हिडिओही व्हायरल होतात. अशीच धक्कादायक घटना हैद्राबादमधून समोर आली आहे.
हैदराबादमधील नागोले स्टेडियममध्ये बॅडमिंटन खेळताना एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बॅटमिंटन खेळता खेळता हा तरुण तो अचानक बेशुद्ध पडला. मित्रांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या भयंकर घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Punjab News: आधी खणखणीत सिक्स, पुढच्याच क्षणी मृत्यू.. तरुणाचा मैदानावर जीव गेला, पाहा VIDEO
समोर आलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुण रविवारी (ता. 28) आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. यादरम्यान तो अचानक पडला. त्याला तातडीने त्याच्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. डॉक्टरांचा दावा आहे की या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
राकेश गुंड असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो खम्मम जिल्ह्यातील तलदा येथील माजी उपसरपंच गुंडला वेकटेश्वरलू यांचा मुलगा होता. राकेश हैदराबादमध्ये एका खाजगी कंपनीत काम करत होता. तो हैदराबादमधील उप्पल स्टेडियमच्या इनडोअर कोर्टमध्ये त्याच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. यादरम्यान तो शटलकॉक घेण्यासाठी जात होता, तेव्हा तो खाली कोसळला. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठला नाही.