Madhya Pradesh IAS Officer Farewell: भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) बदल्या होणे ही सामान्य बाब आहे, पण काही निरोप समारंभ सर्वांच्याच लक्षात राहतात. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्याच्या नागरिकांनी IAS अधिकारी संस्कृती जैन यांना कर्मचाऱ्यांना जो भावपूर्ण आणि अनोखा निरोप दिला, तो असाच खास आहे.
कसा दिला निरोप?
2015 बॅचच्या IAS अधिकारी संस्कृती जैन यांनी जवळपास 1 वर्षापर्यंत सिवनी कलेक्टर म्हणून कार्यभार सांभाळला. मध्य प्रदेश सरकारने नुकत्याच केलेल्या प्रशासकीय फेरबदलात संस्कृती जैन यांच्यासह 12 जिल्ह्यांच्या कलेक्टरची बदली करण्यात आली. त्यांची नियुक्ती आता भोपाळ नगर निगम आयुक्त म्हणून झाली आहे, तसेच त्यांना मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अतिरिक्त प्रबंध संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Menstruation Cycle: मासिक पाळीचा 'हा' Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी, या कुटुंबानं जिंकली सर्वांची मनं )
सिवनीमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी स्वत:चा चांगलाच ठसा उमटवला. प्रशासकीय कार्यक्षमता आणि जनसंपर्क यामुळे त्या ओळखल्या जात. त्यामुळेच त्यांना खूप सन्मान मिळाला. कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून, स्थानिक लोकांनी त्यांना हा अनोखा निरोप दिला.
निरोप समारंभ आणि पार्टीनंतर, त्यांचे सहकर्मी आणि कर्मचारी त्यांना एका सुंदर सजवलेल्या पालखीमध्ये बसवून घेऊन गेले. त्यांच्यासोबत त्यांच्या दोन छोट्या मुली देखील होत्या. बॅकग्राउंडमध्ये "पालकी में होके सवार चली" हे गाणे वाजत होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरण चांगलेच भावनिक झाले होते. या क्षणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कोण आहेत IAS अधिकारी संस्कृती जैन?
IAS अधिकारी संस्कृती जैन यांची कार्यक्षम आणि तितक्याच संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख आहे. 14 फेब्रुवारी, 1989 रोजी श्रीनगर येथे जन्मलेल्या, त्यांचे बालपण भारतातील वेगवेगळ्या भागांत गेले, कारण त्यांचे आई-वडील दोघेही इंडियन एअर फोर्समध्ये कार्यरत होते. त्यांचे वडील एक लढाऊ वैमानिक (फायटर पायलट) होते आणि त्यांची आई मेडिकल कोरमध्ये होत्या.
त्यांनी गोव्यात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर प्रतिष्ठित L.A.M.P. फेलोशिप प्राप्त केली. विशेष म्हणजे, सरकारी अधिकारी बनणे हे त्यांचे सुरुवातीचे लक्ष्य नव्हते; त्यांची पीएचडी करण्याची योजना होती. मात्र, मित्रांच्या सूचनेवरून त्यांनी UPSC परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ती पास केली.
( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )
आपल्या दुसऱ्या प्रयत्नात, त्यांनी भारतीय महसूल सेवा (IRS) मध्ये स्थान मिळवले आणि तिसऱ्या प्रयत्नात अखिल भारतीय स्तरावर 11वी रँक मिळवून त्या IAS अधिकारी बनल्या. 2015 बॅचच्या अधिकारी असलेल्या त्यांना मध्य प्रदेश कॅडर (Cadre) मिळाले.
गेल्या काही वर्षांत, संस्कृती जैन यांनी अनेक प्रमुख प्रशासकीय पदांवर काम केले आहे, ज्यात रीवा नगर निगम आयुक्त, सतना येथे अपर कलेक्टर, मऊगंज येथे एसडीएम आणि अलीराजपूर आणि नर्मदापुरम येथे जिल्हा परिषदेच्या सीईओ यांचा समावेश आहे.