Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर असूनही अनेक गोष्टी दिसत नाहीत. हल्ली सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो पाहायला मिळतात. या फोटोमधली बारीकसारीक तथ्ये शोधून काढणे हे मेंदूला चालना देण्यासाठी छान व्यायाम मानला जातो. जे चित्र तुमच्यासमोर आहे त्यामध्ये प्राणी आणि पक्षी मिळून नऊ आकृत्या आहेत. हे चित्र पाहताच अनेकांना चार प्राणी झटक्यात दिसता, काहींना पाच दिसतात मात्र सगळेच्या सगळे शोधून काढण्यात भलेभले फेल ठरले आहेत.
ऑप्टिकल इल्युजनचे कोडे सोडवणे हा एकाचवेळी डोळे आणि मेंदूला चालना देणारा एक खेळ ठरतो. नजरेला पडत असलेल्या चित्रातील बारीकसारीक तथ्ये,तपशील पाहून त्यातून निर्माण होणारी आकृती ओळखून त्याचा अर्थ लावणे हे सोपे काम नसते. या ऑप्टिकल इल्युजनबद्दल बोलताना एका व्यक्तीने X वर म्हटले की, "हे एक छान कोडं आहे, तुम्हाला किती प्राणी, पक्षी दिसतायत? काहींनी उत्तर दिले 7 तर काहींनी उत्तर दिले 6 तर तिसऱ्या एकाने उत्तर दिले 4 आकृती दिसतायत.
जर तुम्हाल सर्व नऊ आकृती शोधण्यात अडचण येत असेल तर चिंता करू नका. टप्प्या टप्प्याने या आकृत्या समजण्याचा मार्ग सांगण्यात आला आहे. या मार्गाने तुम्ही अशा प्रकारची कोणतीही कोडी सोडवू शकता. हे चित्र बारकाईने पाहा आणि चित्राचा प्रत्येक भाग नीटपणे लक्षपूर्वक पाहा. आकृत्यांच्या बाह्यरेषांवरही लक्ष ठेवा कारण त्या तुम्हाला दोन आकृती वेगळ्या करून दाखवण्यासाठी खूप मदत करतात.
आता तुम्हाला कळाले की या चित्रामध्ये नेमके किती पक्षी प्राणी आहेत? चित्र नीट पाहिल्यास तुम्हाला दिसेल की या चित्रामध्ये अस्वल,गाय, लांडगा, कावळा, मांजर, ससा, फुलपाखरू, चिमणी आणि गोगलगाय आहेत. हे प्राणी पक्षी रेषांच्या आणि सावल्यांच्या आड लपून बसले असून बारकाईने पाहील्यास ते सहजपणे दिसतात.