झुकेगा नही..उंच झाडावर बिबट्याने सिंहाला फोडला घाम, फांदी तुटताच गेम पलटला, Video पाहून लोटपोट हसाल

Lion And Tiger Fight Video Viral :  जंगलात दहशत निर्माण करण्यासाठी वाघ, बिबट्या किंवा सिंहाला अनेक मोठ्या लढाया लढाव्या लागतात. पण हे हिंस्र प्राणी जास्तकरून जमिनीवरच लढतात. पण एका बिबट्याने तर नादच केलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
lion vs leopard Fight Video
मुंबई:

Lion And Tiger Fight Video Viral :  जंगलात दहशत निर्माण करण्यासाठी वाघ, बिबट्या किंवा सिंहाला अनेक मोठ्या लढाया लढाव्या लागतात. पण हे हिंस्र प्राणी जास्तकरून जमिनीवरच लढतात. पण एका बिबट्याने तर नादच केलाय. एका सिंहाला धडा शिकवण्यासाठी बिबट्याने चक्क झाडावर लढाई सुरु केली. बिबट्या सिंहापेक्षा जास्त चपळ असतो. तो वजनाने हलका आणि शरीर लवचीक असल्याने झाडावर वेगाने चढतो. पण सिंहाला झाडावर चढायला मोठी कसरत करावी लागते. सिंह आणि बिबट्यात झालेल्या या खतरनाक लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सिंहाच्या आणि बिबट्याच्या लढाईत कोण जिंकलं?

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की,सिंह फक्त झाडावरच चढत नाही, बिबट्याची शिकार करण्यासाठी तो झाडाच्या कमकुवत फांदीवर जातो. अशातच झाडाची फांदी तुटते आणि नंतर जे काही घडलं, ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिंहाचं वजन जवळपास शंभर किलोच्या आसपास असतं आणि बिबट्याचं वजनही 50 किलोपेक्षा कमी नसतं. 

नक्की वाचा >> डॉक्टर बनला जाएंट किलर! डॉ. पत्नीला टोचलं सर्वात खतरनाक इंजेक्शन..पोलीस तपासात उघड झालं सासऱ्याचं कनेक्शन!

बिबट्या त्याची शिकार लपवण्यासाठी झाडाला सर्वात सुरक्षीत ठिकाण मानतो. पण शिकारीसाठी तो जंगलाचा राजा सिंहालाही झाडावर चढण्यास भाग पाडतो.हिरव्या झाडाच्या फांदीवर सिंह आणि बिबट्यामध्ये मोठं युद्धच रंगतं. शिकारीच्या या थरारक लढाईत बिबट्या कोणत्याही परिस्थितीत त्याची शिकार सोडायला तयार नसतो.तर सिंह सतत बिबट्यावर दबाव टाकून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. सिंह बिबट्याशी दोन हात करता करता झाडाच्या फांदीवर जातो.

इथे पाहा सिंहाचा आणि बिबट्याचा व्हायरल व्हिडीओ

याचदरम्यान सिंह बिबट्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण अचानक झाडाची फांदी तुटते आणि दोघेही खाली पडतात. झाड्यावर खाली पडल्यावर बिबट्या लगेच धूम ठोकतो, पण सिंह तिथेच उभा राहतो. @amazingnature नावाच्या यूजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. 11 सेकंदाचा हा थरारक व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर जवळपास 5 हजार यूजर्सने हा व्हिडीओ लाईक केला आहे. 

Advertisement

नक्की वाचा >>  अखेर लोकप्रिय गायिकेला भाजपने दिलं तिकीट! नव्या 12 उमेदरावांची यादी वाचा एका क्लिकवर