
BJP 12 Candidates List Announced For Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून भारतीय जनता पक्षाने (BJP) उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली आहे. या यादीत 12 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरला अलीनगर मतदारसंघासाठी तिकीट जाहीर करण्यात आलंय.तर आयपीएल आनंद मिश्रा यांना बक्सर येथून तिकीट देण्यात आलंय. तर रंजन कुमार हे मुजफ्फरपूर विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याआधी सुरेश शर्मा यांनी भाजपकडून या मतदारसंघात उमेदवारी लढवली होती. यावेळी सुरेश शर्मा तिकीट मिळवण्याच्या रेसमध्ये होते. पण भाजपने रंजन कुमार यांनी तिकीट जाहीर केलं.
मैथिली ठाकूरला मिळालं तिकीट
भाजपच्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत बहुचर्चित असलेल्या मैथिली ठाकुरला उमेदवारी दिल्याचं घोषित करण्यात आलं आहे. मैथिलीने काही दिवसांपूर्वीच भाजपने प्रवेश केला होता. मैथिलीला दरभंगा येथील अलीनगर विधानसभा येथून तिकीट देण्यात आलं आहे. तर हायाघाट येथून रामच्रंद प्रसाद यांना तिकीट देण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> काय सांगता! चांदीचे भाव 200000 पार.. मुंबईच्या झवेरी बाजारात ऑर्डर झाल्या बंद, कारण काय?
भाजपच्या 12 उमेदवारांच्या लिस्टमध्ये दोन मोठ्या उमेदवारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. बाढ विधानसभेसाठी भाजप आमदार ज्ञानेंद्र ज्ञानू यांचं तिकीटही पक्षाने कापलं आहे. तर छपरा येथून भाजप आमदार सीएन गुप्ता यांच्या जागेवर महिला उमेदवार रिंगणात उतरली आहे. तसच गोपालचंद आमदार कुसुम देवी यांनीही तिकीट कापलं आहे.छपरा मतदारसंघासाठी यावेळी छोटी कुमारी मैदानात उतरली आहे. सोनपूर विधानसभा येथून विनय कुमार सिंह यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे. तसच पक्षाने बक्सर बहुल जागेसाठी आसामचे माजी आयपीएस ऑफिसर आनंद मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने पहिल्या यादीत 71 उमेदवारांची घोषणा केली होती
भाजपने पहिल्या यादीत एकूण 71 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. पक्षाने आज 12 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अशाप्रकारे भाजपने एकूण 83 उमेदवार जाहीर केले. एनडीएमध्ये झालेल्या सहमतीनंतर भाजप राज्यातील 243 विधानसभा जागांपैकी एकूण 101 जागांवर निवडणूक लढवत आहे. जेडीयुसुद्धा 101 जागांसाठी मैदानात उतरलं आहे.
नक्की वाचा >> शिर्डीच्या साईबाबांचा दरबार सजला! भक्ताकडून सोन्याची छत्री अर्पण, हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world