Thar Viral News : ना स्टंटबाजी..ना मारली शायनिंग! रायडरने गोव्यात असं काही केलं..EMI सह घरखर्चही निघाला!

एका व्यक्तीने भन्नाट आयडिया करून थार कारच्या माध्यमातून भरपूर पैसा कमावला. गोव्यात त्या व्यक्तीने असं काही केलं..व्हायरल पोस्ट वाचून सर्वांनाच आश्चर्याच धक्का बसलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Thar Car Side Income Source
मुंबई:

Thar Car Side Income Viral News : आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला सॅलरीसोबत साईड इनकमचा सोर्सही शोधत असतो.पण प्रत्येकाकडे त्यासाठी लागणारी साधने आणि अॅसेट उपलब्ध असतातच असं नाही. ज्यामुळे त्यांना महिन्याला चांगले पैसे कमावणं शक्य होतं. पण गोव्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने 'थार'कारचा असा उपयोग केला,ज्यामुळे त्याचं साईड इनकम सुरु झालं. थार कार रेंटवर दिल्याने त्या व्यक्तीची 14 दिवसांची कमाई 37 हजारांहून जास्त होते. 

या साईड इनकमनेच तो त्याचा EMI आणि महिन्याचा खर्च भागवतो. ज्यामुळे त्याला नोकरीतून मिळणाऱ्या पगारातही बचत करणं शक्य होतं. पोस्ट शेअर करत यूजरने म्हटलं आहे की,त्याच्याकडे चांगली नोकरीही आहे. त्या व्यक्तीनं मागील 14 दिवसांमध्ये झालेल्या बुकिंगचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.यामध्ये 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत त्याला एका राईडसाठी 5 हजारापासून 9 हजारांपर्यंत पैसे मिळाले आहेत. 

थारच्या माध्यमातून कमावले भरपूर पैसे

गोवामध्ये फुल टाईम जॉबसोबतच हा व्यक्ती त्याचा थार कारच्या माध्यमातूनही पैसे कमावत आहे. या व्यक्तीनं रेडिटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, हा माझ्याकडे आधीपासूनच डिमांडिग फुल टाइम जॉब आहे,पण मी कोड क्रॅक केला आहे आणि आता कारच्या माध्यमातून पैशांची कमाई करत आहे.मी माझ्या महिंद्रा थारला गोव्याच्या लोकप्रिय ऑनलाईन रेंटल प्लॅटफॉर्मवर ठेवलं आहे. या साईड जॉबच्या माध्यमातून होणारं इनकम इतकं चांगलं आहे की, यामुळे सर्व खर्च कव्हर होतो.

नक्की वाचा >> धर्मेंद्रसोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनीच्या आयुष्यात आले सर्वात वाईट दिवस, ही-मॅनचं काय चुकलं होतं?

  • माझे सर्व ईएमआ आणि लोन
  • माझा महिन्याचा खर्च आणि सर्व बिल 
  • मला मिळणाऱ्या पगाराची पूर्ण सेव्हिंग करणं शक्य 
  • मला मिळणाऱ्या पैशांची बचत करतो

नक्की वाचा >> Navi Mumbai Crime : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ! 'ती' फॉर्च्युनर कोणाची? सीटवर सापडलं पिस्तुल अन्..

साईड इनकममुळे बिल अन् ईएमआय देणं शक्य

रेडिट पेजवर @ek_sakth_launda नावाच्या यूजरने म्हटलंय की, माझ्या साईड इनकममुळे प्रत्येक बिलाचं आणि EMI चं पेमेंट होतं. यामुळे मला संपूर्ण सॅलरी बचत करणं शक्य होतं.एका यूजरने पोस्टवर कमेंट करत म्हटलंय,हे सर्व पाहायला खूप चांगलं वाटतंय. पण दारूच्या नशेत लोक थारचं नुकसानही करू शकतात. त्यामुळे काही पैशांची बचत करणं गरजेचं आहे.यावर त्या व्यक्तीने रिप्लाय देत म्हटलं, त्या गोष्टीचं काही टेन्शन नाही. माझ्याकडे कारचा इन्शुरन्स आहे.

Advertisement