जाहिरात

Navi Mumbai Crime : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ! 'ती' फॉर्च्युनर कोणाची? सीटवर सापडलं पिस्तुल अन्..

नवीन पनवेल (पूर्व) रेल्वे स्टेशन परिसरात एक फॉर्च्युनर कार संशयास्पदरित्या आढळून आली. या कारमध्ये पिस्तुल सापडल्यांना अनेकांना धक्का बसला आहे.

Navi Mumbai Crime : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ! 'ती' फॉर्च्युनर कोणाची? सीटवर सापडलं पिस्तुल अन्..
Navi Mumbai Crime News (Car Photo- Representative)
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Crime News Today : नवी मुंबईतून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. नवीन पनवेल (पूर्व) रेल्वे स्टेशन परिसरात एक फॉर्च्युनर कार संशयास्पदरित्या आढळून आली. या कारमध्ये पिस्तुल सापडल्याता धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री घडली. पनवेल वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळं मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे. तसच या कारमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सही सापडलं आहे. ही कार डुप्लिकेट नंबर प्लेट लावून चालवली जात होती, अशी माहिती समोर आलीय.याप्रकरणी खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमने चालकाला अटक केली आहे. राजेंद्र निकम (वय 48, रा. चुनाभट्टी, मुंबई) असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्याच नावाचा परवाना पोलिसांना सापडला असून आरोपी राजेंद्रच डुप्लिकेट नंबर लावून ही कार चालवत होता.

वाहतूक पोलिसांची संशयास्पद वाहनावर नजर

2 डिसेंबर रोजी 8.30 वाजता  पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,पोलीस उपनिरीक्षक शेरखाने, पोलीस येळे, मुलाणी आणि निकम हे ऑन ड्युटी होते. त्यावेळी स्टेशन परिसरात MH 03 AH 7863 या क्रमांकाची फॉर्च्युनर पार्किंग केलेली होती. या पार्किंगमुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी संबंधित वाहनमालकाशी संपर्क साधला असता धक्कादायक माहिती समोर आली.मालकाने स्पष्ट सांगितले की, “ही गाडी माझी नाही,कोणी तरी माझ्या नंबरचा गैरवापर करत आहे.याबाबत मी आधीही तक्रारी दिल्या आहेत.”

नक्की वाचा >> विराटच्या शतकाची कमी, पण गंभीरच्या 'या' रिअ‍ॅक्शनचीच होतेय जास्त चर्चा, व्हायरल Video तुम्ही पाहिला का?

दरवाजा अर्धवट उघडा आणि आतमध्ये पिस्तुल

पोलिसांना ही कार संशयास्पदरित्या आढळल्याने त्यांनी या कारची कसून तपासणी केली.कारचा समोरील दरवाजा किंचित उघडा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दरवाजा उघडून तपासणी केली असता कारच्या आत पिस्तुस सापडलं. तसच  राजेंद्र निकम या नावाचे ड्रायव्हिंग लायसन्सही या कारमध्ये होतं. याप्रकरणी संबंधीत व्यक्तीवर मुंबई विभागात विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काही वेळाने चालकही घटनास्थळी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

नक्की वाचा >> 60 वर्षांच्या आमिरने 46 च्या गर्लफ्रेंडसोबत केलं असं काही..कॅमेरा पाहताच ‘मिस्टर परफेक्शनिस्ट'ही झाला फेल!

ज्याच्या नावाचे लायसन्स होते, तोच राजेंद्र निकम (वय 48, रा. चुनाभट्टी, मुंबई) हा व्यक्ती घटनास्थळी आला.तोच डुप्लिकेट नंबर प्लेट लावून फॉर्च्युनर कार चालवत असल्याचं उघड झालं.त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमकडे सुपूर्द केले.डुप्लिकेट नंबर, अवैध शस्त्र आणि पूर्वगुन्हेगाराशी संबंधित माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील गस्त वाढवली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com