Anand Mahindra Latest Tweet : दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय राहतात आणि नेहमी प्रेरणादायी कन्टेट शेअर करत असतात. त्यांनी त्यांच्या मंडे मोटिवेशन (Monday Motivation) पोस्टमध्ये मेघालयच्या मॉलिन्नोंग गावाचा एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे.ईस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील या गावाला आशियाचं सर्वात स्वच्छ गाव म्हटलं जातं.महिंद्रा यांनी गावातील लोकांचं कौतुक केलंय. निसर्गासोबत असलेली त्यांची नाळ आणि स्वच्छतेबाबतची जबाबदारी, याबाबत त्यांनी या गावकऱ्यांचं कौतुक केलं आहे.
आनंद्र महिंद्रा यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
हा व्हिडीओ शेअर करत आनंद्र महिंद्रा यांनी म्हटलंय की, एक मुलाचं पालन करण्यासाठी पूर्ण कुटुंबाची आवश्यकता असते. ही गोष्ट आम्हाला आठवण करून देते की, जबाबदारी कधीच व्यक्तिगत नसते. जबाबदारी समाजाची असते. मेघालयच्या मॉलिन्नोंगमध्ये असे विचार सुंदर जीवनाला आकार देतात.
त्यांनी पुढं म्हटलं की, या गावातील लोकांसाठी स्वच्छता कोणताही अभियान नाहीय.ही एक संस्कृती आहे. जे कर्तव्य, निसर्गाचा सन्मान आणि सामुहिक सलोख्याशी जोडलेली आहे.त्यांनी पुढे म्हटलंय,जर भारताचा चेहरामोहरा बदलायचा असेल, तर हे फक्त घोषणांनी होणार नाही. हे तेव्हा होईल, जेव्हा प्रत्येक जण यात सहभागी होतो. यासाठी त्यांनी मॉलिन्नोंगच्या रहिवाशांना त्यांचं #MondayMotivation म्हटलं आहे.