Medical Miracle : तब्बल 40 तास हृदयाचे ठोके बंद, तरीही वाचला जीव; वैद्यकीय क्षेत्रात हा चमत्कार कसा झाला?

ही कहाणी केवळ एका व्यक्तीचा जीव वाचविण्याची नाही तर मेडिकल सायन्समध्ये होणाऱ्या बदलांचे संकेत देत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
AI Image

Medical Miracle Explained : एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. ज्यामुळे संपूर्ण जगभरातील डॉक्टराना धक्का बसला आहे. एक ४० वर्षीय व्यक्तीच्या हृदयाचे ठोके तब्बल ४० तास बंद होते. मात्र तरीही तो जीवंत राहिला. हे वृत्त कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. सर्वसाधारणपणे काही मिनिटांपर्यंत हृदयाचे ठोके बंद झाले तर त्या व्यक्तीला वाचवणं कठीण होतं. मात्र या केसने सिद्ध झालं की, आधुनिक तंत्रज्ञानाने आता त्या सीमा पार केल्या आहेत. ही कहाणी केवळ एका व्यक्तीचा जीव वाचविण्याची नाही तर मेडिकल सायन्समध्ये होणाऱ्या बदलांचे संकेत आहे.

ही घटना चीनमधून समोर आली आहे. दक्षिण चीनमधील मॉर्निंग पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, ही घटना चीनमधील झेजियांग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन सेकंड एफिलिएट रुग्णालयातून समोर आली आहे. येथील एका डॉक्टरांनी (Lu Xiao ) ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यानंतर हे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Advertisement

कार्डियक अरेस्ट काय असतं? इतका धोकादायक का असतो?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाला अचानक कार्डियल अरेस्ट आला होता. याचा अर्थ त्याच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे बंद झाले आणि शरीरातील इतर अवयवांना रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नव्हतं. अशा स्थितीत प्रत्येक सेकंद अत्यंत महत्त्वाचा असतो. सर्वसाधारणपणे अशा प्रकरणात रुग्णाला तातडीने सीपीआर दिला जातो किंवा इलेक्ट्रिक शॉकच्या माध्यमातून हृदयाची प्रक्रिया सुरू करण्यास प्रयत्न केला जातो. या प्रकरणात डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले, मात्र काहीच उपयोग झाला नाही.

नक्की वाचा - Mumbai News : चौघांचा मृत्यू, कलिंगडाची विक्री घटली; कलिंगडामुळे जीव जाऊ शकतो का? आहारतज्ज्ञांनी केलं अलर्ट

Photo Credit: iStock

ECMO मशीनकडून शेवटची अपेक्षा...

वृत्तानुसार, जेव्हा सर्व प्रयत्न फोल ठरले तर डॉक्टरांनी एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशनची मदत घेतली. ही एक एडवान्स लाइफ सपोर्ट मशीन आहे. जी शरीराच्या बाहेर आर्टिफिशियल हृदय आणि फुप्फुसांप्रमाणे काम करतं.

ECMO मशीन कशी काम करते?

ECMO मशीन रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळते आणि कार्बन डायऑक्साइड काढून टाकते. याचा अर्थ असा की, जेव्हा हृदय आणि फुप्फुसे काम करणं थांबवतात, तेव्हा हे मशीन त्यांची कार्ये हातात घेतात. यामुळेच रुग्णाचे अवयव सुरक्षित राहतात.

४० तास मृत्यूशी झुंज..

वृत्तानुसार, या मशीनच्या मदतीमुळे रुग्ण तब्बल दोन दिवसांपर्यंत जीवंत राहिला. ही वेळ अत्यंत महत्त्वाची होती. यादरम्यान शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचला नाही. हळूहळू साधारण ४० तासांनंतर रुग्णाच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. जी एक हैराण करणारी घटना आहे.

Advertisement

वृत्तानुसार, पारंपरिक सीपीआरने हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांच्या जगण्याची शक्यता केवळ १% असते. याउलट, ईसीएमओ तंत्रज्ञान ही शक्यता जवळपास ५०% पर्यंत वाढवू शकते. म्हणूनच याला आधुनिक तंत्रज्ञानातील एक मोठं यश मानलं जात.

हृदयाचे ठोके सुरू झाल्यानंतरही रुग्णाला तब्बल दहा दिवसांपर्यंत ECMO सपोर्टवर ठेवण्यात आलं. पूर्णपणे रिकव्हरीसाठी हे आवश्यक होतं. हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा येऊ लागली. तब्बल २० दिवसांनंतर उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा झाला आणि स्वत: चालत घरी पोहोचला. सर्वात चांगली बाब म्हणजे त्याला कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाले नाहीत. ही घटना मेडिकल सायन्समधील एक मोठं यश आहे. ECMO सारखा उपचार प्रत्येक रुग्णालयात उपलब्ध नसतात. हे तंत्रज्ञान महाग, गुंतागुतींची आणि विशेषज्ञाच्या टीमटची आवश्यकता आहे.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)