Most Cold Place In The Word Video Viral : 0 डिग्री तापमानात थंडीमुळे परिस्थिती बिकट होते. लेह-लडाखमध्येही आजचं तापमान -3 डिग्री आहे आणि तिथे जाण्यासाठी सैनिकांपासून ते सामान्य भारतीयांपर्यंत सगळ्यांनाच पूर्वतयारी करावी लागते. पण जगात एक अशी जागा आहे जिथे -50 डिग्री तापमान आहे. पण तेथे राहणाऱ्या लोकांसाठी ही आश्चर्याची बाब नाहीय. इतक्या थंड तापमानातही लोक योग्य ती खबरदारी घेतात. जगातील या थंड ठिकाणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ रशियातील सायबेरियाच्या सर्वात मोठ्या भाग याकुटियाचा आहे. सध्या ही जगातील सर्वात थंड जागा आहे. ज्यांच्याकडे हीटर आहे, ते थंडीशी काही प्रमाणात सामना करतात, पण ज्यांच्याकडे ही सुविधा उपलब्ध नाही, ते लाकूड तोडून घरात साठवून ठेवतात. त्याच्याद्वारे ते स्वतःला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच येथे राहणारे लोक असे अन्नपदार्थ खातात, ज्यामुळे थंडीचा परिणाम खूप कमी प्रमाणात जाणवतो.
नक्की वाचा >> मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर प्रवास करताय? आजचा 'हा' भयानक Video पाहूनच ख्रिसमस पार्टीचा प्लॅन करा
इथे पाहा सर्वात थंड ठिकाणाचा व्हायरल व्हिडीओ
सायबेरिया हा रशियाचा एक विशाल प्रदेश आहे, जो जवळपास 13 दशलक्ष चौरस किलोमीटर (5 दशलक्ष चौरस मैल) क्षेत्रफळात पसरलेला आहे. तो रशियाचा सुमारे 77% क्षेत्रफळ व्यापतो. सायबेरिया रशियाच्या मध्य आणि पूर्व भागात स्थित आहे, जो युरोपीय रशियाच्या पूर्वेकडून प्रशांत महासागरापर्यंत पसरलेला आहे. हा प्रदेश उत्तरेला आर्क्टिक महासागरापासून दक्षिणेला कझाकिस्तान, मंगोलिया आणि चीनच्या सीमांपर्यंत विस्तारलेला आहे.
नक्की वाचा >> मिरची पूड, लाकडी बांबू, कोयता अन् रॉड..नवी मुंबईच्या MIDC मध्ये भयंकर घटना! रात्री 12 नंतर..
सायबेरिया 3 मुख्य भागांमध्ये विभागलं
- पश्चिम सायबेरिया: हा भाग उरल पर्वतरांगांपासून येनिसेई नदीपर्यंत पसरलेला आहे.
- मध्य सायबेरिया: हा भाग येनिसेई नदीपासून लेना नदीपर्यंत पसरलेला आहे.
- पूर्व सायबेरिया: हा भाग लेना नदीपासून प्रशांत महासागरापर्यंत पसरलेला आहे.