राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai Crime News Today : नवी मुंबईच्या रबाळे एमआयडीसी परिसरात जमावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात 4 नामनिर्देशित आरोपींसह 10 ते 15 अज्ञात व्यक्तींविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे कोपरी गाव येथील प्रताप जोगेंदर गुप्ता (18) याने तक्रार नोंदवली आहे. रिपोर्टनुसार, काल बुधवारी 24 डिसेंबर रोजी रात्री 12.10 वाजताच्या सुमारास जय भवानी नगरमध्ये एमआयडीसी रोड येथील सार्वजनिक शौचालयाजवळ हा हल्ला करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप त्याच्या मित्रांसह दुसऱ्या एका मित्राला घरी सोडण्यासाठी गेला होता.सचिन मानकर, रूबीन मेत्रे,अभी जॉनरकर,सोलोमन भालके तसेच इतर 10 ते 15 अज्ञात आरोपी अचानक समोर आले आणि त्यांनी प्रतापच्या डोळ्यांत मिरची पूड टाकली.त्यानंतर लाकडी बांबू,लोखंडी कोयता अन् रॉडने त्याला अमानुष मारहाण करण्यात आली.यामुळे प्रतापच्या खांद्यासह डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर प्रतापने तातडीनं रबाळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
नक्की वाचा >> मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर प्रवास करताय? आजचा 'हा' भयानक Video पाहूनच ख्रिसमच पार्टीचा प्लॅन करा
नवी मुंबईत चोरी,घरफोड्या आणि हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ
याप्रकरणी पोलिसांनी बीएनएस कलम 118(1),115(2),189(2),191(2),190 तसेच भादवी कलम 324,323,143,147,149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपी क्रमांक 1 ते 4 यांना बीएनएस 35(3) अन्वये नोटिस बजावण्यात आली आहे.तर इतर 11 अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके करत आहेत. नवी मुंबईत दिवसाढवळ्या चोरी,घरफोडी व हाणामारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
नक्की वाचा >> भारतीय चित्रपटांवर बंदी..पाकिस्तानात Dhurandhar ला का मिळतेय पसंती? अभिनेता म्हणाला, 'आम्ही मुस्लिमांना..'
शहरातील दोन ठिकाणी लाखो रुपयांचा ऐवज लंपास
काल एकाच दिवशी शहरातील दोन ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. तसच 6-7 मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटनाही घडल्या होत्या. तसच दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरट्यांनी डल्ला मारल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नवी मुंबईचा क्राईम ग्राफ झपाट्याने वाढत असल्याचं चित्र आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी गस्त वाढवावी व गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world