Miracle baby: जन्मतःच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, अवघ्या 21 आठवड्यांत झाला बाळाचा जन्म

जाहिरात
Read Time: 2 mins
Miracle baby: फक्त 21 व्या आठवड्यात जन्मला मुलगा. मोडले सर्व रेकॉर्ड
मुंबई:

Miracle baby: एखादे बाळ जन्माला येण्यासाठी साधारण 9 महिन्यांचा कालावधी लागतो. सातव्या किंवा आठव्या महिन्यातही मुलाचा जन्म झाल्याच्या घटना तुम्ही आजूबाजूला पाहिल्या असतील. पण, चक्क 21 आठवड्यात जन्माला आलेलं मुलं तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. अमेरिकेत अमेरिकेत केवळ 21 आठवड्यांच्या गर्भावस्थेनंतर जन्मलेल्या एका चिमुकल्याने जन्म घेतला. 

नॅश कीन (Nash Keen) असे या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचा जन्म 5 जुलै 2024 रोजी अमेरिकेतील आयोवा सिटी, आयोवा येथे झाला. जन्मावेळी त्याचे वजन फक्त 10 औंस (10 ounces) होते आणि तो त्याच्या नियोजित जन्मतारखेपेक्षा 133 दिवस किंवा सुमारे 19 आठवडे लवकर जन्माला आला होता. नॅशने या या महिन्याच्या सुरुवातीला आपला वाढदिवस साजरा केल्यानंतर, त्याला अधिकृतपणे सर्वात अकाली जन्मलेल्या बाळाचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचा (GWR) पुरस्कार मिळाला. त्याने 2020 मध्ये अलबामामध्ये जन्मलेल्या मागील विक्रमधारकाला फक्त एका दिवसाने मागे टाकले.

( नक्की वाचा : Population crisis : घटत्या लोकसंख्येवर अजब उपाय! 'या' देशात विद्यार्थिनींना गर्भवती झाल्यावर मिळणार 1 लाख रुपये )
 

अनेक महिने उपचार

नॅश पोटॅटो  (Nash Potato) असे लाडके नाव असलेल्या या बाळाने जानेवारीमध्ये त्याचे पालक मोली आणि रान्डेल कीन यांच्यासोबत घरी जाण्याची परवानगी मिळण्यापूर्वी सहा महिने हॉस्पिटलमध्ये घालवले आहे. नॅशची आई मोलीनं त्याचा आजवरचा हा प्रवास अद्भूत असल्याचं म्हंटलं आहे. 'एक वर्षापूर्वी, आम्हाला त्याच्या भविष्याबद्दल खात्री नव्हती, आणि आता आम्ही त्याचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे,' असं मोली यांनी सांगितलं. 

त्या पुढे म्हणाल्या की, 'हे अनेक बाबतीत भावनिक आहे. त्याचा प्रवास किती वेगळा राहिला आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही एक विजयासारखी भावना आहे. तो इतका पुढे आला आहे, आणि हा टप्पा फक्त एक वर्षाचा होण्याचा नाही, तर  इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने जे काही पार केले आहे, त्याबद्दल आहे.

Advertisement

 फक्त 285 ग्रॅम वजन

नॅशच्या जन्मावेळी त्याचे वजन फक्त 285 ग्रॅम होते. तर त्याची लांबी फक्त 24 सेमी होती.  मॉलींनी त्याबाबत सांगितले की, मी खूप घाबरले होते... पण जसा त्याला माझ्या छातीवर ठेवण्यात आलं, माझी सगळी भीती नाहीशी झाली. मी त्या स्किन-टू-स्किन संपर्कासाठी इतके दिवस वाट पाहिली होती.'

जवळपास सहा महिने एनआयसीयूमध्ये (NICU) काळजी घेतल्यानंतर, नॅशला जानेवारी 2025 च्या सुरुवातीला घरी परतण्याची परवानगी मिळाली. तेव्हापासून, त्याची तब्येत सतत सुधारत आहे, तरीही त्याला अजूनही काही अतिरिक्त मदतीची गरज आहे

Advertisement


 

Topics mentioned in this article