Health News: तुम्हीही मुलांना मोमोज देताय? 10 वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, स्मरणशक्ती गमावली, नेमकं काय घडलं?

सध्याच्या काळात लहान मुलांमध्ये 'फॅटी लिव्हर'चे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, मैद्याचे पदार्थ आणि व्यायामाचा अभाव ही चिंतेची बाब बनली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Momos Fast Food Effects: बाहेरील उघड्यावरचे चटपटीत पदार्थ आणि 'फास्ट फूड'च्या वाढत्या आकर्षणामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्लीतील बुराडी परिसरात राहणाऱ्या एका १० वर्षीय बालिकेला मोमोज खाण्याच्या नादात आपला जीव गमवावा लागण्याची वेळ आली होती. सततच्या मोमोज सेवनामुळे या मुलीचे यकृत (Liver) निकामी झाले असून, शरीरातील विषारी घटकांमुळे तिच्या मेंदूलाही सूज आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune Crime: भयंकर! बॅटने हाडं मोडेपर्यंत मारलं... अनैतिक संबंधाच्या संशयातून वकील पतीच्या सेक्रेटरीला संपवलं

मोमोज खाल्याने चिमुकलीचं लिव्हर फेल, मेंजुला सूज...

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे आई-वडील नोकरीनिमित्त घराबाहेर असताना ती आपल्या आजोबांकडून पैसे घेऊन दररोज मोमोज आणि चिप्स खायची. काही दिवसांनी तिला विस्मरणाचा त्रास होऊ लागला आणि प्रचंड थकवा जाणवू लागला. प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिचे यकृत निकामी झाल्याचे निदान केले.

Advertisement

​'यथार्थ हॉस्पिटल'मधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची प्रकृती इतकी खालावली होती की तिला 'आयसीयू'मध्ये ठेवावे लागले. सुरुवातीला यकृत प्रत्यारोपणाचा (Liver Transplant) सल्ला देण्यात आला होता, परंतु 'प्लाज्माफेरेसिस' या अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे या बालिकेचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. सध्याच्या काळात लहान मुलांमध्ये 'फॅटी लिव्हर'चे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, मैद्याचे पदार्थ आणि व्यायामाचा अभाव ही चिंतेची बाब बनली आहे.

आजोबांकडून पैसै घेऊन खायची मोमोज

आई-वडील दोघेही नोकरी करतात. जेव्हा ते कामामुळे घरी नसायचे, तेव्हा ती मुलगी मोमोज विकत घेण्यासाठी तिच्या आजोबांकडून पैसे उसने घ्यायची आणि आवडीने खायची. प्लाझ्माफेरेसिसने जीव वाचवल्यानंतर, तिने आता मोमोज खाणे सोडून दिले आहे. तिची आई, सावित्री माथूर, सांगतात की त्यांचे पती, किशोर, मोबाईल फोन ऑपरेटर म्हणून काम करतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, त्या मुखर्जी नगरमध्ये केअरटेकर म्हणूनही काम करतात. त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी तान्या १० वर्षांची आहे आणि लहान मुलगी गौरी आठ वर्षांची आहे.

नक्की वाचा >> Kalyan News: "सत्ता पैसा गुंडगिरी...", कल्याणमध्ये वरुण सरदेसाईंचा शिंदे गटाला इशारा, "मधूर म्हात्रे बेईमान.."