जाहिरात

Kalyan News: "सत्ता पैसा गुंडगिरी...", कल्याणमध्ये वरुण सरदेसाईंचा शिंदे गटाला इशारा, "मधूर म्हात्रे बेईमान.."

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उद्घाटनावेळी आमदार वरूण सरदेसाई यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

Kalyan News: "सत्ता पैसा गुंडगिरी...", कल्याणमध्ये वरुण सरदेसाईंचा शिंदे गटाला इशारा, "मधूर म्हात्रे बेईमान.."
Varun Sardesai KDMC Visit

Mla Varun Sardesai Latest News :  "सत्ता पैसा गुंडगिरी समोर आमचे दहा नगरसेवक एकजूट राहिले. जो सत्ता संघर्ष झाला त्याच्यावर एक नेटफ्लिक्सचा शो होऊ शकतो. सेना बीजेपीची कागदावर युती असली तरी त्यांचे जमत नाही, हे दिसून आले.त्यामुळे सर्व समित्यांच्या निवडणुकीत दिरंगाई झाली. आता विषय अजेंड्यावर घेऊन विरोधीपक्ष नेत्याचा विषय मिटला पाहिजे. लवकरच उद्धवजी विरोधी पक्ष नेत्याची घोषणा करतील.एवढेच नाही तर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले मधुर म्हात्रे बेईमानी करून जनतेसमोर कसे फिरतात",असा सवाल उपस्थित करत आमदार वरूण सरदेसाई यांनी विरोधकांवर टीका केली आहे. 

गटनेते बोरगावकर यांनी पदभार स्वीकारला

शिवसेना यूबीटीचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्या केडीएमसीतील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी वरुण सरदेसाई कल्याणामध्ये आले होते. वरूण सरदेसाई यांच्याहस्ते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर यांचे कल्याण डोंबिवली महापालिकेतील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. गटनेते बोरगावकर यांनी आमदार सरदेसाई यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.याप्रसंगी आमदार वरुण सरदेसाई यांनी पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या  नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्यावर चांगलीच आखपाखड केली आणि त्यांचा समाचार घेतला. 

नक्की वाचा >> Dhule News: वृद्धाची एन्ट्री, हात हवेत, एकटीच चालत गेली! 18 वर्षाच्या तरुणीच्या अपहरणाचं चक्रावून टाकणारं CCTV

विशेष म्हणजे गटनेता कार्यालयाचा लोकार्पण झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटनेते उमेश बोरगावकर यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे गटनेते विश्वनाथ राणे तर भाजपकडून केडीएमसी सभागृह नेते वरुण पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर,उपनेते अल्ताफ भाई शेख,शहर प्रमुख बाळा परब,कल्याण युवा सेना अधिकारी एड नीरज कुमार उपस्थित होते.

नक्की वाचा >> Kalyan News : कल्याण-मुरबाड आणि कल्याण-भिवंडी मार्गावर RTO ची विशेष मोहीम, 'त्या' 12 टॅक्सींवर केली कारवाई

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com