पिझ्झा आवडीने खाणाऱ्या सगळ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतामध्ये तुम्हाला अशी बरीच माणसे सापडतील जी कधीही पिझ्झा खाऊ शकतात. भारतीयांना पिझ्झाची भुरळ पडल्यापासून भारतामध्ये अनेक पिझ्झाची दुकाने सुरू झाली. मध्य प्रदेशातील एक जोडपंही पिझ्झाचं शौकीन होतं. मात्र त्यांच्यासोबत घडलेल्या एका प्रकारामुळे त्यांना यापुढे पिझ्झा खाताना खावा की नाही याचा 100 वेळा विचार करावा लागेल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय घडलं?
मध्य प्रदेशातील एका जोडप्याने पिझ्झा विकत घेतला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून मिळालेल्या तपशीलानुसार हा पिझ्झा स्टेडीयम रोडवरील डी-लाईट कॅफे या रेस्टॉरंटमधून विकत घेतला होता. रोहम बरमन नावाच्या व्यक्तीने हा पिझ्झा विकत घेतला होता. त्याने जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा त्याला पिझ्झाचं चीझ वळवळताना दिसलं. नीट बघितलं असता त्याला एक अळी दिसली. बारकाईने पाहीलं असता त्याला पिझ्झामध्ये बऱ्याच अळ्या असल्याचं दिसलं. त्याने ताबडबोत या प्रकाराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला.
नक्की वाचा : TEA या शब्दाचा फुलफॉर्म तुम्हाला माहिती आहे का ?
अन्न सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष
खाद्य पदार्थांच्या सुरक्षिततेबाबत अन्न सुरक्षा विभागाचे अनेकदा अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी अनेकदा खाद्यपदार्थांमध्ये किडे,अळ्या आढळून आल्या आहेत. चॉकलेटमध्ये, कोल्ड ड्रींकमध्ये तर अनेकदा अळ्या आढळल्याचे प्रकार घडले आहेत. काही महिन्यांपूर्वी हैदराबादमध्ये चॉकलेटमध्ये गांजा असल्याचं आढळून आले होते. धक्कादायक बाब ही होती की हे चॉकलेट आकर्षक पॅकेजसह आयुर्वेदिक औषधाच्या नावानं विकलं जात होतं. पोलिसांनी गुप्त सुचनेच्या आधारावर कारवाई केली करत उत्तर प्रदेशात तयार केलेली गांजायुक्त चॉकलेटची जप्त केली होती. आयुर्वेदिक औषधाच्या नावाने विकलं जाणारं हे चॉकलेट हैद्राबादला नेण्यात येत होते. सायबरबाद पोलिसांनी किराणा दुकानात विकली जाणाऱ्या चॉकलेटची मोठी खेप जप्त केली होती.