
अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची मुख्य भूमिका असलेला 'मिस्टर इंडिया' (1987) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात कॉमेडी, ॲक्शन आणि रोमान्सचा तडका होता. जो आजही फॅन्सच्या लक्षात आहे. या चित्रपटात लहान मुलांची फौज दाखवण्यात आली होती. या बच्चे कंपनीनं त्यांच्या सहज अभिनयानं सर्वांनाच प्रभावित केले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या बच्चे कंपनीमधील 'टिना' ची भूमिका करणारी मुलगी आजही सर्वांच्या चांगलीच लक्षात आहे. तिच्या निरागसतेचं सर्वांनीच कौतुक केलं होतं. होय, तीच टीना जिचा चित्रपटात बॉम्बस्फोटात मृत्यू होतो. चित्रपटात टीनाच्या भूमिकेला उत्कृष्टपणे साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव हुजान खोदैजी आहे.
हुजान खोदाइजी आता मोठी, सुंदर आणि ग्लॅमरस झाली आहे. तिची काही छायाचित्रे समोर आली आहेत, जी पाहिल्यानंतर चाहत्यांना तिला ओळखणे कठीण झाले आहे.
मिस्टर इंडियामधील टीना आता काय करते? याचा आम्ही शोध घेतला. त्यानंतर आम्हाला आढळले की हुजान खोदाइजी इन्स्टाग्रामवर आहे, परंतु तिने तिचे प्रोफाइल प्रायव्हेट ठेवले आहे. तरीही, चाहत्यांना तिची छायाचित्रे कुठून ना कुठून मिळतातच. हुजान खोदैजीचा सध्या व्हायरल होत असलेला नवीन फोटो निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आहे.

या फोटोत हुजान खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या गालावर पडणाऱ्या डिंपल्समुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे. हा फोटो पाहिल्यानंतर लोक पुन्हा एकदा तिच्या निरागसतेवर फिदा झाले आहेत.
( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
मिस्टर इंडियामध्ये काम केल्यानंतर हुजान पुन्हा कोणत्याही दुसऱ्या चित्रपटात दिसली नाही हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. याबाबतच्या वृत्तानुसार, ती मार्केटिंग क्षेत्रात काम करत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, हुजान खोदाइजी 'लिंटास' नावाच्या कंपनीत अॅडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world