ब्रिटनमध्ये धक्कादायक अनुभव! वर्ल्ड टूरवर निघालेल्या मुंबईकर बाईकरची मोटरसायकल चोरीला, मदतीचं आवाहन

Mumbai Biker's Motorcycle Stolen In UK :  जगाच्या प्रवासावर निघालेल्या एका मुंबईकर बाईकरच्या स्वप्नांना ब्रिटनमध्ये अचानक खीळ बसली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Biker's Motorcycle Stolen In UK : योगेश यांनी 1 मे, 2025 रोजी मुंबईहून त्यांचा जागतिक दौरा सुरू केला होता. 118 दिवसांत त्यांनी 17 देशांचा प्रवास केला आहे.
मुंबई:

Mumbai Biker's Motorcycle Stolen In UK :  जगाच्या प्रवासावर निघालेल्या एका मुंबईकर बाईकरच्या स्वप्नांना ब्रिटनमध्ये अचानक खीळ बसली आहे. योगेश अलेकरी (33) नावाच्या या बाईकरची मोटारसायकल नॉटिंगहॅम येथे चोरीला गेली असून, त्यात त्याचा पासपोर्ट, पैसे, आणि अन्य महत्त्वाच्या वस्तू होत्या. अलेकरी यांनी मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन केले आहे.

काय घडला प्रकार?

योगेश यांनी 1 मे, 2025 रोजी मुंबईहून त्यांचा जागतिक दौरा सुरू केला होता. 118 दिवसांत त्यांनी 17 देशांतून 24,000 किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. पुढील टप्प्यात त्यांना आफ्रिकेकडे जायचे होते, परंतु 28 ऑगस्ट रोजी त्यांच्यासोबत ही घटना घडली. नॉटिंगहॅम येथील वूलॅटन पार्कमध्ये ते नाश्ता करत असताना, दिवसाढवळ्या चार चोरट्यांनी त्यांची मोटरसायकल चोरून नेली. या चोरीमुळे 15,000 पाउंडहून अधिक किमतीचे साहित्य, ज्यात लॅपटॉप, कॅमेरे, मोबाईल फोन आणि रोख रक्कम होती, ते सर्व गेले.

योगेशने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे, मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली नाही. केवळ तक्रार क्रमांक देऊन त्यांनी त्याची बोळवण केली. यामुळे हताश झालेल्या योगेश यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले. "लोकांनी मला इराण आणि तुर्कीमध्ये प्रवास करण्याबाबत चेतावणी दिली होती, पण मला तिथे सुरक्षित वाटले. पण, ब्रिटनमध्ये मात्र माझ्यासोबत अशी घटना घडली," असे त्यांनी सांगितले.

( नक्की वाचा : Vomiting While Travelling: प्रवासात उलट्या होतात? चिंता सोडा! मोशन सिकनेसवरील रामबाण इलाज आणि सोपे उपाय )
 

मदतीचे आवाहन

योगेशने सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज शेअर करून मदतीचे आवाहन केले आहे. "ही फक्त एक बाईक नव्हती, तर माझे घर, माझे स्वप्न होते," असे म्हणत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या घटनेमुळे त्याचा प्रवास थांबला असून, तो आता बाईक आणि पासपोर्ट परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Advertisement

ब्रिटनमध्ये घडलेली बाईक चोरीची ही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध युट्यूबर आणि बाईकर 'इटची बूट्स' यांच्यासोबतही अशीच घटना घडली होती.
 

Topics mentioned in this article